वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष-प्रतिनिधी-जिवती ):- जिवती शहरात प्रथमच रुद्रा प्रतिष्ठान जिवती यांच्या वतीने कोव्हीड योद्धा यांचे सन्मान करण्यात आला. शहरात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या रूद्रा प्रतिष्ठान यांचे कडून मान्यवरांचे पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांच्या निमित्ताने 18 ते 44वयोगटातील लोकांना कोरोणा लसीकरण व हत्ती रोग व फायलेरिया गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती च्या वतीने देण्यात आले.
चिमूर वनक्षेत्रात सेवा देत असताना आपल्या सहकार्यावर झालेला हल्ला आपला जीव धोक्यात टाकून परतवून लावून सहकार्याचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी दाखवलेले धाडस व शौर्य अतुलनीय असल्याने त्यांचा व कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीच्या काळात जिथे रुग्णाचे जवळचे नातेवाईक पाठ फिरवतात तिथे रुग्णाचे मनोबल वाढवून त्यांना आपली सेवा देणारे आणि आपल्या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडवून आणणारे जन सेवक यांचा सत्कार होणे हे अगत्याचे होते. ही गोष्ट ध्यानी धरून रुद्रा प्रतिष्ठान यांनी वरील कार्यक्रम घडवून आणला. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश देवकते उपसभापती पंचायत समिती हे होते तर उद्घाटक अंजना ताई भिमराव पवार सभापती पंचायत समिती या होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय ऑस्कर साहेब बीडिओ पंचायत समिती जगन्नाथ गारूळे साहेब बाल विकास प्रकल्प अधिकारी रामदास आनकाडे तालुका वैद्यकीय अधिकारी,मेहबूब भाई शेख,भीमराव पवार,डॉक्टर अंकुश गोतावळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सत्कार मूर्ती महेश देवकते उपसभापती पंचायत समिती जिवती, परमेश्वर तंबुळगे STPF वनरक्षक चिमूर,संभाजी बळदे STPFवनरक्षक चिमूर,विजय गोतावळे सामाजिक कार्यकर्ता आणि रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकार) इत्यादी मान्यवरांचे सत्कार प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
यावेळी रुद्र प्रतिष्ठान जिवती सुनील जाधव अध्यक्ष,मनोहर पानपट्टे सचिव,विलास वावरे उपाध्यक्ष,व्यंकटी तोगरे सहसचिव,विलास कळसकर कोषाध्यक्ष,नामदेव मुंडे,वाकू राम सोन्नर,दत्ता जाधव, कृपा नंद गभणे,अशोक मोरे,अंबादास वाघमारे,पुंडलिक गिरमाजी,राजेश राठोड यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमा चे सूत्र संचालन राजेश राठोड यांनी प्रास्ताविक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील जाधव सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री वाकुराम सोन्नर सर यांनी मानले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...