*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ते..!
नयन मडावी (शिंदोला ): चारगाव ते शिंदोला आणि शिंदोला ते कळमना रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून ची अति-दुर्व्यस्था, व संघोट्याचा लिंबू बनून बसलेले पसरीसरातील कार्यकर्ते आणि प्रशासन - कळमना हा मार्ग जणूकाही खड्डयांचा मार्ग असल्याची आश्चर्यजनक बाब पाहण्यास मिळत आहे. या मार्गाने मोठं मोठी जीवघेणी गुडघा भर एवढी खड्डे पडलेली असून या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे टी.व्ही. शो वर दाखविण्यात येणाऱ्या खतरो के खिलाडी या मालिके सारखे झालेले असता "रस्त्यावर खड्डे की खड्डयात रत्ता!!" हेच समजन्याची कठीण परिस्थिती परिसरातील लोक अनुभवत आहे.
वणी तालुक्यातील चारगाव - शिंदोला - कळमना या मार्गावर संपूर्ण पणे खडड्यांनी वर्चस्व प्रस्थापित करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले आहे. या रस्त्यावर हजारो खड्डे पडली असून शेकडो मोठ्ठी मोठ्ठी जीवघेणी खड्डे तयार झाली आहे. तर आता या पावसाड्यामुळे खडड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यावर कुठे कुठे 10 - 10 ते २५ - २५ फुटा पर्यंतचे लांब लांब डोबकाळे साचुन प्रवास करताना खोलीचा अंदाज लावणे कठीण असून जीवघेणी अपघाते होण्याची शक्यता आहे.
चारगाव शिंदोला कळमना हा रस्ता वर्दळीचा असून या रस्त्यावर शिरपुर पोलीस स्टेशन तथा शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र (सरकारी दवाखासना) आहे. 40 ते 45 गावातील लोकांना उपचारा करीत जातांना याच रस्त्याचा अवलंब/वापर करावा लागतो. आणि शिंदोला हे गाव्या परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्याने आठवडी बाजार, दवाखाने, उपकेंद्र शिंदोला(सरकारी दवाखाना), आणि इतर जीवनाश्यक गोष्टींसाठी 20 - 25 गावच्या लोकांना इथे यावे-जावे लागते.
जवळपास मुंबई पर्यंत जाणार ACC , अंबुजा, अल्ट्राटेक्त या कारखान्यांचा कच्चा-पक्का माल याच रस्त्यानी नेला आणला जातो. तसेच परिसरातील मोहदा येथील गिट्टी क्रेशन आणि कोळसाखाणींतलाही माल याच रस्त्याने नेला-आणला जातो. या कारखान्यांच्या, खदानींचा माल ने-आन करणाऱ्या जड वाहनांमुळे या रस्त्याची आणखीन बेक्कार परिस्तिथी होत आहे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान होते असून ज्यावेळी पीक हाती येत त्यावेळी पिकविक्री साठू बाजारपेठेत जात असतांना देखील शेतकऱ्याला ह्या रस्त्यावरील खडड्यांना सामोरे जावे लागते. या मुळे गेल्या हंगामात पिकविक्रीसाठी शिंदोला, आबाई, वेळाबाई या जिनिंग ला जात असलेल्या 10-12 कापसाच्या गाड्या उलटल्यात. अर्थात आम्ही कास्तकार सर्व संकटांना तोंड देत पीक घेतो, पीक घरी आणतो पण पीक विकायला जात असताना मधीच या रस्त्यावरील खड्डयांना तोंड देता देता बाजारपेठेत जाण्या अगोदरच पिकासोबत मातीत मिळतो म्हणजे आता या निसर्गसोबत शासन- प्रशासना सारखाच हा रस्ताही आमचा जणू काही वैरी झाला आहे.
1. निवडणुका तोंडावर असतांना आमदारकी-खासदारकी साठी लढत असलेले प्रत्येक उमेदवार आणि पावसाड्यातल्या बेडकांप्रमाणे बोंबलत सुटणारी त्यांची कार्यकर्ते मंडळी आता शांत का बसली आहेत?
2. संबंधित क्षेत्रातील प्रत्येक उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर चारगाव - शिंदोला - कळमना या रस्त्यातील जोडगावांना भेट देतो, गावात मिटींगी घेऊन रस्त्याच्या सुव्यवस्थेचा विषय घेऊन जनतेची दिशाभूल करतो त्यांना अफवेत लोळवितो मग भा.दं.वि. द्वारे त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही?
छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 ते 400 वर्षांअगोदर बांधलेली गड कोठ, गड-किल्ले, बुरुंज अजूनही जशी च्या तशी ऐटीत उभी आहेत, पण आमच्या आजच्या तंत्रज्ञानाने निपुण असलेल्या या युगात एखाद्या लोकप्रतिनिधींच्या 5 वर्षीय कालावधीत बांधलेला रस्ता त्याचा कार्यकम संपण्याच्या अगोदर पूर्णपणे उखळला जातो याला कारण काय?
चारगाव - शिंदोला - कळमना हा २० ते २५ किलो मीटर अंतराचा हा चंद्रपूर जिल्ह्याला जोडलेला नियमिती रहदारीचा मार्ग. या रस्त्याने दररोज शेकडो वाहनांची ये - जा सुरू असतात. रहदारीच्या या मार्गावर गेल्या २ - ३ वर्षांपासून खड्ड्यांनी आक्रमण करून आता पूर्णपणे त्यांनी रस्त्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. रस्त्यावरील खडड्यांची दुरुस्ती करण म्हणून त्यात मुरूम टाकण्यात आला मात्र त्यामुळे जनतेचे आणि प्रवासीयांचे अजून हालन हाल झालेत.. या रस्त्याने सायकल चालवणे म्हणजे जिकरीचे झाले आहे. या रस्त्याची आवाजावी सुरू असली तरी जीवघेण्या खड्यांच्या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करनाऱ्या जनतेची "रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता" प्रतिक्रिया मिळते. तसेच संबंधित विभागांनी पावसड्याच्या दिवसांत रहदारीचा सोईस्कर असा मार्ग बनवावा. अशी मागणी १५ - १६ गावचे हजारो नागरिक करीत आहेत
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...