Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय झाले सुरू.

डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय झाले सुरू.

प्रविण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावचे तलाठी कार्यालय डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव,उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा व गिरीश खडसे तलाठी यांच्या पुढाकाराने रिधोरा गावचे तलाठी कार्यालय झाले सुरू. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील २७ तलाठी कार्यालय लाईट अभावी बंद असल्याची बातमी दैनिक देशोन्नतीने  १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत डॉ. रवींद्र कानडजे,उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा व गिरीश खडसे तलाठी रिधोरा यांनी पुढाकार घेऊन रिधोरा गावचे तलाठी कार्यालय सुरू केले आहे. डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना असे निर्देश दिले की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा ञास होवू नये म्हणून तातपुर्ती लाईट घेऊन वीज जोडून तलाठी कार्यालय सुरू करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहे. सदर लोकाभिमुख प्रशासन राहण्याच्या दृष्टिकोणातुन तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी अथांग प्रयत्न करून तलाठी यांना निर्देश देऊन सदर कार्यालय सुस्थितीत चालू करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन करत तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आप आपल्या परिने आप आपल्या हलक्यातील तातपुर्ती लाईट घेऊन तलाठी कार्यालय सुरू करून शेतकऱ्यांना शेवा देणे सुरू केली आहे. परंतु रिधोरा व विहिरगाव येथील तलाठी कार्यालयाचे काम पूर्ण होवून तीन ते चार वर्षे लोटून गेले होते परंतु येथील तलाठी कार्यालय बंदच होते रिधोरा गावच्या तलाठी कार्यालयाचे चोरट्यांनी लाईट बोर्ड, लाईट, काचेची खिडकी, संडास सिट असे एक ना अनेक सामन चोरून नेले होते याबाबत दैनिक देशोन्नतीने १६ नोव्हेंबर रोजी तलाठी कार्यालय लाईट अभावी बंद व सामन गेले चोरीला असल्याची बातमी प्रकाशित केली होती. या बातमी दखल घेत डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव यांनी रिधोरा गावचे तलाठी गिरीश खडसे यांना निर्देश देऊन रिधोरा गावचे तलाठी कार्यालय तातपुर्ती लाईट घेऊन सुरू करायला सांगितले. तहसीलदार यांनी निर्देश देताच तलाठी गिरीश खडसे यांनी पुढाकार घेऊन रिधोरा गावचे सरपंच उमेश गौऊळकार यांच्या मदतीने तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले. तलाठी कार्यालय सुरू होताच रिधोरा गावच्या शेतकऱ्यांना विनामूल्य सात बारा व आठ सरपंच, पोलीस पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तलाठी कार्यालय सुरू केल्या बदल डॉ. रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव, उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा, तलाठी गिरीश खडसे रिधोरा याचे शेतकऱ्यांनी आभार मानले. यावेळी ढगेश्वर मांदाडे पोलीस पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पी डब्ल्यू डी इलेक्ट्रिकल उप अभियंता यवतमाळ यांनी राळेगाव तालुक्यातील २७ तलाठी कार्यालयाचे वीज जोडणीचा प्रस्ताव अमरावती कार्यालय पाठविण्यात आला आहे. सदर वीज जोडणीची रक्कम प्राप्त होताच सर्व तलाठी कार्यालयामध्ये वीज जोडल्या जाईल.तातपुर्ती वीज जोडणी करून तलाठी कार्यालय सुरू करण्याचे निर्देश मी तलाठ्यांना दिले आहे : डॉ. श्री.रवींद्रजी कानडजे तहसीलदार राळेगाव

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...