आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
लक्ष्मी शहा कडुन होत होती कर्मचाऱ्यांची पिळवणूक, वन विभाग दिपाली चव्हान यांच्या प्रकरणामुळे झाले अलर्ट.
ब्रम्हपूरी:- ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणा-या दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना सोमवारी मुख्य वनरक्षकाच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे.शासकीय कामाचा अनुभव नसून कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागण्याचा ठपका शहा यांच्यावर ठेवण्यात आला असून , या कारवाईमुळे वनविभागात चांगलीच खळबळ माजली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट च्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभाग अलर्ट झाला आहेत.
वरिष्ठ वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला लागले असून दक्षिण वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी लक्ष्मी शहा यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देऊन दमदाटी केली जात होती. मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. शासकीय कामामध्ये लागणारे साहित्य खरेदी न करता काम करण्यासाठी त्रास देणे पाळीव प्राण्यांच्या नुसकान प्रकरणांमध्ये धमकी देऊन बनावट गॅस तयार करण्यासाठी त्रास देणे, कर्मचाऱ्यांचे सीआर खराब करण्याची धमकी देणे, गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क न करता कोणतीही सभा आयोजित न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला . दरम्यान 15 मे रोजी एकारा येथील विश्रामगृहावर वरिष्ठ वनधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. दक्षिण ब्रह्मपुरी वन क्षेत्रात मागील तीन वर्षात एकुण ०६ मृत्यू तर १७ जण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. वन वणव्याच्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडलेल्या असुन वनसंपदेचे नुस्कान झाली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या शासकीय कामामध्ये तत्पर राहत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून महाराष्ट्र नागरी (शिस्त व अपिल ) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (1) अन्वये मुख्य वनरक्षकांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी लक्ष्मी शहा यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत शहा यांना मध्य चांदा वन विभागाचे उपवन रक्षक पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...