Home / चंद्रपूर - जिल्हा / ‘मिशन वात्सल्य’ योजनेचा...

चंद्रपूर - जिल्हा

‘मिशन वात्सल्य’ योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

‘मिशन वात्सल्य’ योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : कोव्हीड मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ वर्षा जामदार, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. जी.एल.दुधे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा अग्रणी बँकेचे स्वप्नील कुथे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले की, कोव्हीडमध्ये दोन्ही किंवा एक पालक गमाविलेल्या बालकांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत त्वरीत लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच ज्या प्रकरणामध्ये कोव्हीडमुळे मृत्यु असा उल्लेख नाही व ती कुटुंबे या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, अशा प्रकरणात आयसीएमआर कडे पाठविण्यात आलेली यादी आरोग्य विभागाकडून प्राप्त करून घ्यावी. विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात कोविड मुळे एक / दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांची (18 वर्षांखालील) एकूण संख्या 527 आहे. 13 बालकांनी दोन्ही पालक गमाविले असून यात 18 वर्षांवरील दोन बालके आहेत. तर दोन जणांना सावत्र आई आहे. नऊ बालकांच्या प्रकरणांपैकी पाच प्रकरणात शासनाकडून पाच लाखांची एफडी बँकेत काढण्यात आली आहे. तसेच उर्वरीत चार प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे. पीएम केअर फंड अंतर्गत अशा बालकांना 10 लाखांची मदत करण्यात येते.

दोन्ही पालक गमविलेल्या नऊही बालकांचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात आले आहेत. 527 पैकी 464 मुले बालसंगोपन योजनेसाठी पात्र असून सप्टेंबर अखेर पर्यंत 334 मुलांना प्रतिमाह 1100 रुपये याप्रमाणे लाभ देण्यात आला आहे. तसेच अनाथ बालकांच्या शैक्षणिक फी माफी संदर्भात 140 जणांपैकी 82 मुलांना लाभ देण्यात आला असून उर्वरीत मुलांची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...