Home / महाराष्ट्र / महसूल विभाग वणी तालुक्यात...

महाराष्ट्र

महसूल विभाग वणी तालुक्यात 74 ग्रा.प. मध्ये निवडणुका घेण्यासाठी सज्ज

महसूल विभाग वणी तालुक्यात 74 ग्रा.प. मध्ये निवडणुका घेण्यासाठी सज्ज

8 ग्रामपंचायत अविरोध

वणी:-   येत्या 15 जानेवारीला वणी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. गावातील आपसी समाजस्यामुळे 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत. त्यामुळे येथील महसूल प्रशासन 74 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका घेण्यासाठी सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्याम धनमने यांनी दिली आहे. 
  वणी तालुक्यातील चिखली, चनाखा, कुड्रा, मुंगोली, गोवारी(को), पेटुर, शेवाळा, निवली या आठ गावच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत.  ज्या 74 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होत आहे त्यापैकी रासा, सुकानेगाव, वांजरी, राजूर( कॉ.), नांदेपेरा, लालगुडा, उकणी, पुनवट, घोन्सा ही आठ गाव संवेदनशील आहेत. त्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी वणी तालुक्यात एकूण 258 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यासाठी 284 मतदान अधिकाऱ्यांचे पथक प्रशिक्षण घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, व इतर तीन मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 74 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 44040 पुरुष, 39544 स्त्री असे एकूण 83584 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...