आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
नदीच्या पुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुझवले पण प्रदूषण कायम ठेवले
भारतीय वार्ता: शिरपूर -शिंदोला-बोरी रस्त्याच्या नूतनीकरणाचे कामाला सध्या ब्रेक असून शिरपूर चारगाव फाटा पर्यत दयनीय अवस्था झाली आंदोलन व मागणी लक्षात घेऊन बांधकाम विभागाने रस्त्यावर माती मिश्रीत मुरूम टाकला व रस्ता काम पूर्ण झाले हे दाखवू दिले आहे. पण मागील वर्षी निर्गुडा नदी पुलावर काम केले नदीक्षेत्राच्या भागात पेचेस केल पण जसे थे झाल्याने नदीवरील पुलावरील रस्त्याचे काम पुलाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली ठप्प असून या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना या खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास करावा लागतआहे.
या निर्गुडा नदीवरील पुलाचे बांधकाम नव्याने करायचे की नाही हा प्रश्न असल्याने या पुलावरील व पुलाच्या दोन्ही बाजूला काही मीटर रस्ता तसाच नादुरुस्त राखण्यात आला आहे. या रस्त्यावर व पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून थोडा पाऊस आला तरी या सर्व खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून दुचाकी-चारचाकी यासह रस्त्यावरून प्रवास करणार्या पादचार्यांना या खड्ड्यातील पाण्याने अंघोळ करण्याची वेळ येते. रस्ता खराब झाल्याने एवढ्या अंतरावर धुळीचे साम्राज्य पसरते. हा खराब रस्ता पार करण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ लागतो
त्यातच गिट्टी क्रेशर सुरू असल्याने गौणखनिज भरलेला ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने तर अनेकदा नागमोडी चालताना व डुलताना दिसतात. शिवाय रस्त्याचे खड्डे न भरल्याने अवजड वाहने पुलावर आदळून पुलाला धक्के बसतात व हे धक्के पुलावरून जाणार्याना सहज जाणवतात. सदर पुलावरील रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची गरज असून जेव्हा पूल पाडणार आहे तोपर्यंत तरी या रस्त्यावरील खड्डे बुजवणे गरजेचे आहे. सध्या चारचाकी, लहान वाहने या खड्ड्यात गेल्याने वाहनाचा खालचा इंजिनचा भाग रस्त्याला थटत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे इंजिनचे नुकसान होऊन मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सदर रस्त्यावरील खड्डे मुजवून तातडीने दुरुस्त करावा व वाहनधारकांचा सुरळीत प्रवास व्हावा, याची दक्षता बांधकाम विभाग व ठेकेदारांनी घ्यावी, अशी मागणी वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांकडून, पोलीस कर्मचारीयाचे कडून मागणी होत आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...