श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
सकाळी ७ ते सायंकाळी ७ सुरूराहनार
वणी: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनची नवीन नियमावली लागू करण्यात आली. मागील काही दिवस कडक निर्बंध लागू केल्यानंतर आता कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याने नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांबरोबरच इतरही दुकानांना सुरु करण्यास अनुमती देण्यात आली आहे. बाजरपेठेच्या वेळांमध्ये बदल करून दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कृषी केंद्रांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली होती. परंतु खरिपाचा तोंडावर आलेला हंगाम लक्षात घेता कृषी केंद्रांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला असून कृषी सेवा केंद्रे आता सकाळी ७ ते सायं. ७ वाजे पर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाकडून अनुमती देण्यात आली आहे.
ब्रेक द चैन अंतर्गत लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतेरिक्त इतर दुकानांनाही सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. तसेच बाजारपेठेची वेळ वाढवून दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्या कृषी उपयोगी वस्तूंची खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. खरिपाचा हंगाम अगदीच तोंडावर आल्याने शेती उपयोगी वस्तूंची खरेदी करण्यास शेतकऱ्यांची कृषी केंद्रांमध्ये झुंबड दिसून येत आहे. कृषी साहित्य खरेदी करण्यास वेळ कमी पडू नये याकरिता प्रशासनाने कृषी सेवा केंद्रांच्या वेळेत मोठा बदल करत सकाळी ७ ते सायं. ७ वाजे पर्यंत कृषी सेवा केंद्रे सुरु ठेवण्यास अनुमती देण्यात आली. सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बि-बियाणे, कीटकनाशके, खते विक्री केंद्र, ठिबक सिंचन, तुषार सिंचन विक्री दुकाने, कृषी साहित्य व कृषी अवजार विक्री दुकाने उद्या ३ जून पासून सकाळी ७ ते सायं. ७ वाजे पर्यंत सुरु ठेवता येणार आहे. असे असले तरी दुकानदारांनी जास्तीत जास्त पार्सल सेवा व ऑन लाईन सेवा देण्यावर भर देण्याचे प्रशासनाने सुचविले आहे.
व्हाट्सऍप व मोबाईल कॉल वरून शेकऱ्यांकडून त्यांना हव्या असलेल्या साहित्यांची माहिती घेऊन कृषी निविष्ठा घरपोच देण्याचा जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कृषी सेवा देतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...