वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रादेशिक नळ योजना ठरली पांढरा हत्ती समाविष्ठ गावाकरिता स्वतंत्र नळ योजना तयार करा -आबीद अली
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये शेकडो गावाकरिता पस्तीस प्रादेशिक नळ योजना तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत 1996 ते 2000 या वित्त वर्षात कोट्यावधी चे नियोजन करून काम करण्यात आली त्यामधील आजही दोन दशक लोटूनही शेकडो गावे तहानलेली असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक नळ योजनेच्या कारभारावरून दिसून येते अनेक ठिकाणी लांबच लांब पाइपलाइन असल्याने एका प्रादेशिक नळ योजनेमध्ये चार ते दहा गाव समाविष्ट करून नियोजन करण्यात आले होते मात्र झालेले बांधकाम अनेक ठिकाणी पाईपलाईन तुटण्याचा प्रकार यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा गाव पातळीवरील ग्रामीण पाणीपुरवठा समित्या एक आयोजित वेगवेगळ्या असलेल्या समाविष्ट ग्रामपंचायती नियोजन व जबाबदारी झटकण्याची प्रक्रिया यामुळे नेहमी जनतेचा रोष ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यावरच दिसून येतो मात्र अनेक योजना घडाई पेक्षा मळाई अधिक होत असल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्ष लोटूनही शेकडो गावे पाण्याच्या अधिकारापासून वंचित आहे.
गेल्या एक दशकापासून प्रशासन व लोकप्रतिनिधी कडे सातत्याने गाव निहाय नियोजन करून प्रादेशिक नळ योजनेमधून गावे वगळा व त्या ठिकाणी बोरवेल किंवा विहिरीचे खोदकाम करून पाण्याची सुविधा उपलब्ध करा अशी मागणी केल्या गेली पाणीपुरवठा करिता अनेक उपक्रम जलस्वराज भारत निर्माण स्वच्छ पाण्याचा अधिकार अशा अनेक उपक्रमातून नियोजन केल्या गेले तर काही गावांमध्ये सातत्याने दुरुस्तीचे काम करून सुद्धा पाणी पोहोचले नाही शासन वेळोवेळी दुरुस्तीवर लाखोंचा खर्च करण्यापेक्षा जीर्ण झालेल्या अनेक योजना पांढरा हत्ती ठरत असल्याने व अधिक प्रमाणात खर्च निधीचा अभाव यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर होणारे परिणाम वसुलीची टक्केवारी अल्प यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पस्तीस प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरत असल्याने तसेच कोरपना तालुक्यातील चार प्रादेशिक नळ योजनेमध्ये चौतीस गावाचा समावेश आहे परंतु यातील दहा टक्केही गावांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था प्रादेशिक नळ योजनेची झाली असल्याने शासन आणि प्रादेशिक नळ जिल्ह्यातील सर्व गावे वगळून त्या गावांमध्ये पाईप लाईन टाकीचे काम सुव्यवस्थित आहे.
अल्प खर्चामध्ये त्याठिकाणी सुरळीतपणे पाणीपुरवठा होऊ शकतो याकरिता गावपातळीवरच पाणी स्त्रोत बळकटीकरण बोरवेल किंवा विहिरीवरून योजना तयार केल्यास गावपातळीवरील ग्रामपंचायत ग्रामीण पाणीपुरवठा समिती यांचे सनियंत्रण देखरेख वसुली यास बाबीवर नियंत्रण राहू शकतो म्हणून अपयशी ठरलेल्या प्रादेशिक योजना हद्दपार करून जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरातील संपूर्ण गावांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात या आखण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असून गेल्या तीन दशकात अनेक प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरल्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपणा येथे स्वतंत्रा चे 75 वर्ष साजरे होत असताना 1998 व 2015 मध्ये या शहराकरिता दोन योजना तयार झाल्या कोट्यावधी रुपये खर्च करूनही नळाला पाणी पोहोचले नाही व योजना फस्त ठरली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये होऊन सुद्धा तीन कोटी रुपये खर्चाची योजना 2015 मध्ये तयार करून सुद्धा तब्बल पाच वर्षात एक कोटी फस्त करण्यात आले.
मात्र नागरिकां ची तहान भागलेली नाही अशी परिस्थिती असून जिल्हाभरातील सर्व प्रादेशिक नळ योजना निर्लेखित करून गाव तिथे नियोजन करण्याची मागणी ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर आमदार सुभाष धोटे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पाठवलेल्या निवेदनातून केली असून एकदा योजना हद्दपार करून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...