वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शेतकरी संघटना -विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेतृत्वात रास्तारोको आंदोलन
सय्यद शब्बीर जागीरदार (ता.प्र.जिवती) : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समितिच्या नेतृत्वात जिवती येथील शहिद विर बाबुराव शेडमाके चौक येथे ( ता. २६ ) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विदर्भात सगळ्यात जास्त शेतीशी संबंधित असलेला शेतकरी व शेतमजुर वर्ग असून सत्ता कुठल्याही सरकारची असो, शेती निगडित प्रश्नांवरील धोरणे नेहमी उदासीनच राहिली, विदर्भ मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, बालमृत्यु, शेतकरी आत्महत्या, नक्सलवाद या सारख्या असंख्य व्याधींनी जर्जर झाला आहे. सध्या विदर्भाची परिस्थिति दिवसेंदिवस दयनीय व चींताजनक होत चाललेली आहे. गेल्या दहा वर्षात चाळीस हजार शेतकरी आत्महत्या एकट्या विदर्भात झाल्या, कुपोषणाने दोन लाख बालके गेल्या पंधरा वर्षात मृत्युमुखी पडली, उद्योगांची इथे मारामार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. एकटा विदर्भ पूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या विज निर्मितिच्या प्रमाणात अर्ध्याहुन अधिक विज निर्मिति करतो तरी इथला शेतकरी लोडशेडिंग झेलतो, तरी विदर्भाच्या मुद्यावर निवडून आलेले आमदार, खासदार सुस्तावलेले लोकप्रतिनिधी याकडे लक्षपूर्वक कानाडोळा करुन वैदर्भीयन जनतेला त्याच डबक्यात खितपत जगन्यास सांगतात व विदर्भाच्या मुद्यावर नेहमीच वैदर्भियांची फसवनुक करत असतात हा मोठ्ठा विरोधाभास आहे. असे मत शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समिति च्या विदर्भवादी शेतकऱ्यांनी आंदोलकांना प्रबोधित करतांना व्यक्त केले.
विदर्भ वेगळा करा ,वन्यप्राण्यांपासून शेती पिकाचे रक्षण करा , कोरोना काळातील वीजबिले माफ करा, २०० युनीट विज मोफत द्या २०० युनीटच्या वर विज दर निम्मे करा, सिंचनासाठी चोवीस तास वीज पूरवठा करा, तीन पिढ्यांची अट रद्द करुन जमिनीचे पट्टे वाटप करा, साप चावून माणूस मय्यत झाल्यास मय्यत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करा, या मागण्यांसाठी जिवती येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो शेतकरी - शेतमजूर व तरुणांनी रस्ता रोखल्याने चौतरफा वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांच्या नाऱ्यांनी जिवती शहर दुमदुमुन निघाला. याची दखल शासनाने जर घेतली नाही तर पुढील आंदोलन हे तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनकांना यावेळी अटक करण्यात आली. बंदोबस्तासाठी जिवती ठाण्याची पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
आंदोलनाच्या यशस्वितेसाठी शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका जिवती या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटना जिल्हाउपाध्यक्ष निळकंठराव कोरांगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, विदर्भ राज्य युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाम राठोड, शेतकरी संघटना तालुका जिवतीचे सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाप्रमुख, स्वतंत्र भारत पक्षाचे देविदास वारे तालुकाध्यक्ष , शेतकरी संघटना दलित आघाडीचे उध्दव गोतावळे तालुकाध्यक्ष, गणेश कदम तालुका उपाध्यक्ष, सय्यद इस्माईल तालुका कार्याध्यक्ष, अरविंद चव्हाण विदर्भ राज्य युवा आघाडी तालुकाध्यक्ष, सुनील राठोड विराआंस तालुकाध्यक्ष, विनोद पवार विराआंस शहर अध्यक्ष, वैजनाथ सावरगावे,सायसराव कुंडगिर, शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील शेकडो शेतकरी -शेतमजूरांनी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...