आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): उत्तरप्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलनाला दहशतीने चिरडून टाकणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला राळेगाव येथील व्यापाऱ्यांनी संमिश्र असा प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने काही प्रमाणात स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत पाठिंबा दिला.
न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून व केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचां संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीलाही लाजवेल अशा प्रकारचे आहे. शेतकर्यांचा सामुहिक नरसंहार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहे.
राळेगाव शहरात सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद साठी व्यापाऱ्यांना आग्रह न धरता यवतमाळ चौफुली येथे जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करून लखीमपूर येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
आदिवासी विकास मंडळ नाशिक उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) वसंतरावजी पुरके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंदभाऊ फुटाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीपभाऊ ठूणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाशभाऊ खुडसंगे, शिवसेनेचे शहर प्रमुख राकेशभाऊ राऊळकर, काँग्रेसचे नेते जानरावभाऊ गिरी, प्रसादभाऊ ठाकरे, अजिंक्यभाऊ वैद्य, अफसर अली सैयद, मंगेशभाऊ राऊत, दिलीपजी कन्नाके, गिरीधरजी ससनकर, भानुदासजी राऊत, श्रीधरजी थूटूरकर, संदीपजी पेंदोर, तेजसजी ठाकरे, सौरभजी पारिसे, प्रशांतजी काटकर, मंगेशजी पिंपरे,मधुकरराव राजूरकर, इम्रान पठाण, रउफ शेख, महादेव लांबाडे, मनोज पेंदोर, वसंत पोतफोडे, किशोर दोडके, मनिष कोपरे, प्रज्वल काळे, प्रणय गवळी, राहुल बहाळे, कुंदन कांबळे, प्रफुल खसाळे, बाळु दरणे, बादशाह काजी, शुभम चिडाम, प्रदीप पिंपरे, सलमान सय्यद, आकाश भोकरे या सह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...