Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पत्नी सपना ने प्रेमिच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पत्नी सपना ने प्रेमिच्या मदतीने निलेश ची हत्या केली

पत्नी सपना ने प्रेमिच्या मदतीने निलेश ची हत्या केली

पत्नी सपना ने प्रेमिच्या मदतीने निलेश ची हत्या केली

वणी : २० दिवसापुर्वी वणी पोलीस स्टेशन हद्दीतील रासा येथिल जंगल परिसरात निलेश सुधाकर चौधरी(३०) या तरुणाचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.प्रथम पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. या दरम्यान दि.१६ सप्टेंबर ला निलेश ची बहिण हिने वणी पोलीस ठाणे गाठुन भाऊ निलेश ची हत्या निलेश च्या पत्नीच्या अनैतिक संबंधांतुनच केली असुन चंद्रशेखर गोसाई दुर्गे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भाऊ निलेश ची हत्या करुन रासा येथिल जंगल परिसरात म्रुत्युदेह झुडुपात फेकल्याची तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरुन पोलीसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून नवनियुक्त ठाणेदार शाम सोनटक्के यांनी सपोनी/ पिंगळे व डि.बी पथकाला मार्गदर्शन करुन खुनाचा शोध लावण्याचे आदेश देताच यांनी तपासाचे चक्र जलदगतीने फिरवुन संशयीत मुख्यआरोपी चंद्रशेखर गोसाई दुर्गे (३३), आशिष पिदुरकर (२५), योगेश उघडे (२०), गौरव दोरखंडे (२२) व एक विधीसंघर्ष बालक सर्व रा. रासा यांना ताब्यात घेवून चौकशी सुरू केली असता चंद्रशेखर दुर्गे याचे निलेशच्या पत्नी सपना सोबत अनैतीक संबंध असुन या अनैतीक संबधातुनच निलेशचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपींनी कट रचुन घटनेच्या दिवशी मृतकाला रासा गावाच्या फुलोरा जंगलात नेवून त्या चौघांनी त्याचा गळा आवळला व लगत असलेल्या झाडाझुडुपात गळफास लावुन आत्महत्येचा बनाव रचला असल्याची कबुली दिली. त्यामुळे चार आरोपीसोबतच आणखी एका विधीसंघर्ष बालकाला पोलिसांनी अटक केली.

दि.१६ सप्टेंबर ला चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या पोलीस कोठडी दरम्यान निलेश च्या पत्नी सपना च्याअनैतिक संबंधांतुन हत्या झाल्याने या प्रकरणात निलेश ची पत्नी सपना पोलीसांच्या रडारवर होतीच, त्या दिशेने तपास केला असता पती निलेश च्या हत्येची मास्टरमाइंड पत्नी सपना निलेश चौधरी (२५) हिच असुन तिनेच हत्येचा कट घडवून आणल्याची बाब आरोपीच्या पोलीस कस्टडी दरम्यान निष्पन्न झाल्याने शनिवारी दि.१८ सप्टेंबर ला निलेश ची पत्नी सपना ला ताब्यात घेऊन भादंवी ३०२, (३४),३२८,२०१, १२०(ब) कलमा नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एकुण पाच आरोपी अलल्याचे निष्पन्न झाले असुन या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...