*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
दत्तकुमार खंडागळे: भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराने आभाळ गाठले आहे. कॉंग्रेसच्या सत्ता काळात पासष्टीत असलेल्या दराने आज शंभरी गाठली आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात किंवा त्या आधी भाजपाचे नेते पेट्रोल व डिझेलच्या दरावाढीवर अतिशय ज्वलंत आणि भडकावू बोलत होते, आंदोलने करत होते. स्मृती मँडम, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज ही सगळी मंडळी तर सिलेंडरच्या टाक्या घेवून रस्त्यावर बसत होते. पेट्रोल, डिझेल व गँस दरवाढीविरोधात भाजपवाले लोकांना पेटवत होते. याचवेळी पतंजली उद्योग समुहाचे उद्योगपती रामदेव उर्फ स्वामी रामदेव बाबा यांनी देशभरात भाजपाच्या प्रचारात उडी ठोकून प्रचाराचे रान उठवले होते. नरेंद्र मोदींना निवडूण द्या ! ते ३० रूपये दराने पेट्रोल देतील ! असे आवाहन ते लोकांना करत होते. रामदेव पढले धार्मिक नेते, त्यात त्यांच्या अंगावर भगवी कफनी. सामान्य भारतीय माणसाचा साधूवर, मौलवीवर प्रचंड विश्वास. जेव्हा धार्मिक नेते काही भूमिका घेतात तेव्हा त्या लोकांना अधिक विश्वासू वाटतात. पतंजली योगसुत्र शिकवणा-या व पतंजली उद्योग समुह चालवणा-या उद्योगपती रामदेव यांनी देशभर काळा पैसा आणि पेट्रोल-डिझेलच्या महागाईवरून रान उठवले होते. देशभरातील लोकांना भडकवले होते. त्यामुळे मोदी सत्तेत आले की ३० रूपये दराने पेट्रोल मिळेल, सगळा काळा पैसा बाहेर येईल अशी अपेक्षा तमाम भारतीयांच्यात होती.
देशात २०१४ ला भाजपची सत्ता स्थापन झाली. मोदी भारताचे प्रधानमंत्री झाले. अवघ्या भारतात परिवर्तनाची लाट होती, अच्छे दिनाची अपेक्षा होती. "आता देशात अच्छे दिन येतील, महागाई कमी होईल, लोक सुखनैव राहतील, काळा पैसा देशात आणला जाईल" असेच सर्वांना वाटत होते. २०१४ ला सत्तेत आलेल्या सरकारचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला. पुन्हा २०१९ ला लोकांनी मोदींना निवडूण दिले पण परस्थिती जैसे थे नव्हे तर अधिक बिकट होत गेली. देशाचा जीडीपी घसरलाय, महागाईने आभाळाच्यावरचे अवकाश गाठले आहे. वर्षाला दोन करोड रोजगार देणार होते पण इथे दोन करोड रोजगार जावू लागलेत. छोटे-छोटे उद्योग-धंदे कधीच यमसदनाला गेले. अच्छे दिन फक्त भाजप, संघपरिवार व रामदेवजी यांनाच आले आहेत.
जन-सामान्यांच्या वाट्याला पहिल्यापेक्षा भयंकर परस्थिती आली आहे. काळा पैसा आणायच्या ऐवजी लोकांच्या खिशातलाच पैसा मोदींनी काढून घेतला. नोटबंदी करून विकासाची नसबंदी करून टाकली. देशात धार्मिक कट्टरता वाढीस गेली आहे. ऐन युध्दात कुरूक्षेत्रावर कर्णाच्या रथाची चाकं रुतावीत तसे देशाच्या विकासाची चाकं रूतली आहे़त. देश परतीच्या पावलांनी निघाला आहे. संविधान आणि लोकशाही व्यवस्थेला जातीयवादी उंदरांनी कुरतडायला सुरूवात केली आहे. संघ परिवाराचे छुपे जातीयवादी अजेंडे राबवायला सुरूवात केली आहे. न्यायव्यवस्था, संसदीय व्यवस्था आणि त्यांचे महत्व संपुष्टात आणण्याचे काम बेमालूपणे चालवले आहे. १३० कोटी जनतेचा प्रतिनिधी गेल्या सहा वर्षात लोकांशी एकतर्फी संवाद साधतो आहे. तो कोणत्याच गोष्टीचे उत्तर देत नाही. जनसंसद नावाची नवी हुकूमशाही व्यवस्था त्यांनी अंमलात आणली आहे. एकतर मोदी जाहिर सभेत येतात, नसेल तर 'मन की बात' सारख्या कार्यक्रमातून पुढे येतात. तिथून एकटेच लोकांशी बोलतात. त्यांना कुणी प्रश्न विचारत नाही, ते कुणाला उत्तर द्यायला बांधिल नाहीत. पत्रकार प्रश्न विचारतील म्हणून ते पत्रकार परिषद घेत नाहीत. एखादा अक्षयकुमार सारखा नकलाकार पुढे करून मोदीजी तुम्ही आंबे कसे खाता ? हा लोकांच्या जिव्हाळ्याचा राष्ट्रीय प्रश्न विचारायला लावला जातो. याबाबत सामान्य माणसं काही बोलायला लागली, विचारायला लागली तर मुर्खांच्या झुंडीच्या झुंडी निर्माण करून ठेवल्या गेल्या आहेत. त्या लगेच प्रश्न विचारणा-या लोकांच्या अंगावर जातात. अँनिमल फार्म या पुस्तकात लेखक जॉर्ज आर्वेलने अंगावर जाणा-या रानटी कुत्र्याचे जसे वर्णन केले आहे अगदी तसेच चित्र इथे आहे. त्यामुळे विरोधकांचे आवाज क्षिण होत निघाले आहेत. विरोधी पक्षातले लोक जुण्या भानगडी बाहेर काढतील या भितीने गारठले आहेत. जे धाडस करतात त्यांचा मिस्टर लोया लोया होतो.
देशाचे असे चित्र असताना २०१४ ला मोदींचा प्रचार करणारे उद्योगपती रामदेवजी आज कुठे आहेत ? कॉंग्रेसच्या सत्ता काळात नाडी तुटेपर्यंत (लंगोटची नव्हे चंद्र नाडी आणि सुर्य नाडी) भारत माता की जय, वंदे मातरम म्हणून घसा काढत होते. गेल्या सहा वर्षात त्यांनी जे सांगितले होते त्यातले काहिच घडले नाही. तेव्हाचे हे चुडीदारवाले क्रांतिकारक आज मुग गिळून का गप्प आहेत ? ते आता का आंदोलन करत नाहीत ? आता का रस्त्यावर उतरून सरकारला ललकारत नाहीत ? ३० रूपये लिटर दराने पेट्रोल देणार होते त्याचे काय झाले ? काळा पैसा भारतात आणायचा होता त्याचे काय झाले ? मोदी सत्तेत आल्या-आल्या या सरकारने पहिलाच निर्णय घेत पेट्रोल-डिझेलची दरवाढ करण्याचे अधिकार सरकारला होते तेच रद्द केले. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे निर्णय घेण्याचे अधिकार सरकारऐवजी कंपण्यांना देवून टाकले. म्हणजे चोराच्या हातात न्याय निवाडा करण्याचे काम सोपवावे तसे केले. कंपण्या जर दर ठरवणार असतील आणि त्याचा निर्णय घेणार असतील तर त्या लोकांचा का विचार करतील ? रामदेवांनी याबाबत आजवर ब्र शब्द काढलेला नाही. रामदेवांच्या आणि मोदींच्या थापा, लबाड्या व ढोंग पंतजली योगसुत्रात बसते का ? योगसुत्रातल्या अष्टांग मार्गात हा दांभिकपणा बसतो का ? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांग मार्गात या लबाड्या बसतात का रामदेवजी ? रामदेवजी तुम्ही दांभिक असाल, भामटे व लबाड असाल पण तुम्ही जे भगवे वस्त्र धारण करता ते अनमोल आहे. भारतीयांच्यात त्या भगव्या वस्त्राबाबत प्रचंड श्रध्दा, आस्था आहे. ती भगवी कफनी पवित्र आहे. तिचे पावित्र्य का संपवता आहात ? का त्या पवित्र व महान वारसा असलेल्या भगव्या रंगाला बदनाम करता आहात ? हा चालूपणा योगसुत्रात बसतो का रामदेवजी ?
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...