आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
पुणे (प्रतिनिधी) : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचा श्वास आहे. त्यांचे परखड लिखाण आणि प्रबोधनपर साहित्य महाराष्ट्राला नवी दिशा देणारा आहे. प्र. ठाकरे यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रबोधनाचा महाजागर निर्माण होऊ शकतो, एवढी ताकद त्यांच्या साहित्यात आहे. मात्र ठाकरे कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचले नाही म्हणून ते चुकीच्या इतिहासकाराचे समर्थन करतात. त्यांनी वेळीच चूक दुरुस्त करून प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे... असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख संभाजी ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने करून दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य पोहोचल्यामुळे समृद्ध तरुणांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी फार मोठी मदत झाली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख आम्हाला मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यामुळे झाली, हा इतिहास आहे.
आम्ही प्रबोधनकारांच्या रक्ताचे वारस नसलो तरी विचारांचे वारसदार नक्की आहोत. कारण संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचा मूळ गाभा हे प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आहे. त्यामुळेच आम्ही परिवर्तनाची भाषा बोलतो आहोत. हीच भाषा त्यांचे रक्ताचे वारसदार विसरले ती फार मोठी खंत आहे. राज ठाकरे यांनी ही चूक तात्काळ दुरुस्त करावी अशी विनंती आहे.
ब. म. पुरंदरे हे खोटा इतिहास मांडणारे आणि चुकीच्या इतिहासाचा प्रचार करणारे तथाकथित इतिहासकार आहेत. ते जेम्स लेन समर्थक असून जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीच्या प्रकरणात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. चुकीचा इतिहासात मांडणाऱ्याचं समर्थन करणं हा शिवद्रोह आहे. मा. राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने आज राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण पुस्तक रूपात साहित्य 'कुरियर' द्वारे पाठवण्यात येणार आहे. ते संपूर्ण साहित्य राज ठाकरे यांनी वाचावे व कार्यकर्त्यांनाही वाचन संस्कृती वाढवावी ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील रायकर, सोनू कुंजीर आदी उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...