वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शेत पिकांचे मोठे नुकसान; अनेक मार्ग बंद
कोरपना: बुधवारपासून पडणाऱ्या सतंतधार पावसामुळे कोरपना तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावातील शेत शिवारात पावसाचे पाणी घुसल्याने कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक महत्वाचे मार्ग आज ही बंद होते.
तालुक्यातील पंच्याहत्तर गावातील शेतशिवारातील पिकांना याचा मोठा फटका बसला. यात कोरपना सह कन्हाळगाव , नांदा , बिबी , पारडी , जेवरा, अंतरगाव , नारंडा, धानोली, वनसडी, सावलहिरा, कमलापूर, वडगाव, सोनुर्ली, आवारपूर, गाडेगाव, भारोसा, भोयेगाव, कवठाळा,लोणी, चिंचोली, कोडशी, पिपरी, पिपर्डा , शेरज, माथा आदी गावांचा समावेश आहे.
भोयगाव - चंद्रपूर हा महामार्ग मध्यरात्री पासून बंद पडला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. अंतरगाव जवळील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने वनसडी - भोयगाव मार्ग बंद पडला आहे. तर सावलहिरा गावाजवळील रपटा वाहून गेल्याने गावकऱ्यांना जाण्या येण्याची अडचण निर्माण झाली आहे. कमलापुर गावातील काही घरात मध्यरात्री नाल्याचे पाणी घुसले गेले होते. त्यामुळे काही घराची अंशत पडझड झाली आहे. अति पावसामुळे कोरपना - आदिलाबाद, कोरपना - वणी , वनसडी - भोयगाव, वणोजा - गडचांदुर् मार्ग ही जागोजागी उखडला गेला आहे. पैनगंगा - वर्धा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकडच्या गावाला सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. अमलनाला व पकडीगुद्दम धरण ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...