Home / चंद्रपूर - जिल्हा / अपर पोलीस अधिक्षक यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड..!

अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड..!

एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना चंद्रपूर-बल्लारपूर रोडलगत बाबानगर येथे रात्रीच्या सुमारास काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची  गोपनीय माहिती मिळाली.  त्याआधारे अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे बाबानगर येथील राजेश गुप्ता नावाच्या इसमाच्या घरावर धाड टाकली.  

या धाडीमध्ये गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे वय 29 वर्ष, रा.पेठ वार्ड आंबेडकर चौक राजुरा, राजेश रामचंद्र गुप्ता वय 45 वर्ष रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर, प्रदीप दिनकर गमगमवार वय 41 वर्ष रा.महाकाली वार्ड, हाफिज रेहमान खलील रेहमान वय 53 वर्ष रा गुरूनगर वणी, शेख असिफ शेख चांद वय 30 वर्ष रा. पारवा ता. घाटंजी, नंदकुमार रामराव खापने वय 29 वर्ष रा. कोलगाव ता. मारेगाव, गणेश रामदास सातपाडे वय 35 वर्षे रा. गडचांदूर, समीर सचिन संखारी वय 50 वर्ष रा. विवेक नगर चंद्रपूर, आकाश चंद्रप्रकाश रागीट वय 30 वर्ष रा.लक्कडकोट ता. राजुरा, गौरव लक्ष्मण बंडीवार वय 26 वर्षे रा. नांदाफाटा ता. कोरपना, श्रीनिवास रामलु रंगेरी वय 50 वर्ष रा. लालपेठ, सुरेश पुनराज वावरे वय 53 वर्ष रा. बाबुपेठ वॉर्ड चंद्रपुर यांच्यासह एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. सदर इसमांकडून 1 लक्ष 97 हजार 250 रुपये,  11 मोबाईल फोन, 3 चारचाकी वाहने, 3 दुचाकी वाहने असा एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            याबाबत शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे अपराध क्रमांक 858/2021 च्या कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे. सदर कामगिरी अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. असे पोलीस विभागाच्या जनसंपर्क कक्षाने  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...