Home / महाराष्ट्र / वणीत प्रतिबंधित असलेला...

महाराष्ट्र

वणीत प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखावर धाड..

वणीत प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखावर धाड..

१४ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त

वणी : शहरासह तालुक्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाकू  मोठ्याप्रमाणात विक्री होत असल्याचे सततच्या कारवायातून दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी चिखलगाव येथील महादेव नगरी मध्ये केलेल्या कारवाईत सुगंधित तंबाकू, माजा,सुपारी असा लाखोंचा मुददेमाल जप्त करण्यात आला होता तर काही दिवसापुर्वीच दिपक चौपाटी परीसरात एका किराणा व्यापार्याकडे लाखोचा प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाकू, माजा असा मुददेमाल जप्त करण्यात आला होता. अशिच एक कारवाई तालुक्यातील रासा येथे पोलिसांनी केली. या कारवाईत १४ लाख ५५ हजार ६०० रुपयेचा सुगंधित तंबाकू, माजा सह मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.२४ एप्रिल रोजी वणी पोलीसांना गूप्त माहिती वरून खबर मिळाली की, तालुक्यातील रासा येथे प्रतिबंधित सुगंधी तंबाखुची खेप आली असुन एका घरात उतरवणे सुरु आहे, या माहितीच्या आधारावरून पोलीसांनी रासा येथे जावुन धाड मारली असता नामे दिपक महादेव खाडे (२७) वाहन चालक रा. रासा ता.वणी हा व त्याचे सोबत दिपक कवडु चावला (४०)रा. महादेव नगरी वणी असे आपले घरी टाटा एस वाहन क्र. एम.एच- २९ ए.टी -०८८५ ने आनुन विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला जर्दा/माजाची तंबाखु चा माल उतरवुन थांबुन असतांना  मिळाले, त्यांचे घरझडती घेतली असता पांढरे रंगाचे बोरी, गोणीत एकुण २०० नग मजा १०८ हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेले ५० ग्रॅम वजन असलेले ZEN TOBACCO PVT LTD कंपनीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखुचे डब्बे किंमत प्रती डब्बा १९१ रुपये असे ४ बोरीमध्ये एकुन ८०० नग एकुण किंमत १ लाख ५२ हजार ८०० रुपये , पांढरे रंगाचे बोरी, गोणीत एकुण ४० नग ईगल हुक्का शिशा तंबाखु पॉकीट ZEN TOBACCO PVT LTD कंपनीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखु चे एकुन १२ गोणी, पोती प्रत्येक गोणीत ४०० ग्रॅम वजनाचे ४० पॅकीट अं.कीं २ लाख ५९ हजार २०० रुपये ,पांढरे रंगाचे एकुन १८ बोरी, गोणीत मजा १०८ हुक्का शिशा तंबाखु चे पॉकीट ZEN TOBACCO PVT LTD कंपनीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखुचे एकुन १८ गोणी पोती प्रत्येक गोणीत २०० ग्रॅम वजनाचे ४० टिन डब्बे प्रत्येकी कि.७५५ रुपये असा एकूण ५ लाख ४३ हजार ६०० रुपये असा एकूण ९ लाख ५५ हजार ६०० रुपयेचा मुददेमाल व माल वाहतुकी करीता वापरण्यात आलेले टाटा एस वाहन क्र. एम.एच-२९ ए.टी- ०८८५ किंमत ५ लाख असा एकून १४ लाख ५५ हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल मिळुन आला. वरिल नमुद मुद्देमाल हा चंद्रपुर येथील वसीम यांचे जवळुन आणला असल्याचे सांगितले. सदर आरोपीतांनी कोव्हीड-१९ आजारास कारणीभूत असे कृत्य केले व मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी  दिपक महादेव खाडे (२७) रा.रासा ता. वणी, दिपक कवडु चावला (४०)रा.महादेव नगरी वणी , वसीम रा.चंद्रपुर यांचेविरुद्ध कलम १८८, २६९, २७०, २७१, २७२, २७३ मा.वि सह २, ३ साथ रोग अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करून तपासात घेतला. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप वि.पो.अ.वणी यांचे मार्गदर्शनात पो.नि./वैभव जाधव, पोउनि/ गोपाल जाधव, पोहवा / सुदर्शन वानोळे, पोना/ सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पोकों/ पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी केली.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...