वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी –आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर: जिल्हयात दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने शेतक-यांच्या शेतपिकाचे, नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे, अन्नधान्य आदिंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरांची पडझड झाली. तर हजारो हेक्टरवरील पीके पुराच्या पाण्याखाली आली. पंधरा पैकी ९ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असुन जिल्हयत एकुण ९०४० मीमी पावसाची नोंद झाली आहे. बल्लारपूर शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यु झाला. ऐतिहासिक किल्याचा काही भाग खचला, विसापुर गावात भिंत कोसळून एक महिला जखमी झाली. राजुरा तालुक्यात अनेक मार्ग पुरामुळे बंद झाले. मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली. जिवती तालुक्यात अनेक गावांमध्ये सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
तेलंगाणातील पुराचा महाराष्ट्रातील पिकांना फटका बसला. ब्रम्हपुरी तालुक्यातील सुध्दा गोसीखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडल्याने शेतीला फटका बसला आहे. मुल तालुक्यात अनेक घरांची पडझड व शेतीचे नुकसान झाले आहे. कोरपना तालुक्यात कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अमलनाला धरण १०० टक्के भरल्याने वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले.
जिल्हयात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणावर फटका बसला असुन जिल्हा प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावे आणि नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. जिल्हयातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेत नुकसान ग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत त्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहनही देखिल आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...