आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): चार दशकाआधी यवतमाळ च्या मातीत मुहूर्तमेढ रोवलेल्या साप्ताहिक आत्मबल ने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या सहा वर्षांपासून राळेगाव येथून हे साप्ताहिक प्रसिद्ध होतं आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा वसा घेऊन सुरु असलेली वाटचाल उत्तरोत्तर अधिक दमदार होतं आहे. साप्ताहिक आत्मबल दिवाळी अंक -2021 प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने याची प्रचिती आली. दि. 3 नोव्हें. रोजी कृ.उ. बा. स. शेतकरी भवन येथे हा प्रकाशन सोहळा जयवंन्तराव काळे यांचे अध्यक्षतेखाली थाटात पार पडला. सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवाळी सारखा सण असतांनाही आवर्जून हजेरी लावल्याने हा प्रकाशन सोहळा अविस्मरणीय ठरला.
आ. प्रा. डॉ. अशोकरावजी उईके, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतरावजी पुरके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुलभाऊ मानकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा नमो महाराष्ट्र दैनिकाचे संपादक वसंतराव घुईखेडकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीणभाऊ देशमुख, उत्कृष्ट अग्रलेखक अनिल दादा राऊत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनिषभाऊ पाटील, इनकम टॅक्स कमिशनर अनिलभाऊ खडसे, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे,प्रशांतभाऊ तायडे सभापती पं. स.,उषाताई भोयर,अरविंदभाऊ वाढोणकर,नंदकुमारभाऊ गांधी,मिलिंदभाऊ इंगोले,अशोकरावजी पिंपरे,अॅड. प्रफुल्लभाऊ चौहाण,जानरावभाऊ गिरी,अंकुशभाऊ मुनेश्वर,विनोदभाऊ काकडे,राजुभाऊ रोहणकर,दीपकभाऊ देशमुख,राजेंद्रभाऊ तेलंगे,शंकरभाऊ वरघट,विनयभाऊ मुणोत,शशिकांतभाऊ धुमाळ, प्रदीपभाऊ ठुणे, कुणालभाऊ भोयर,या सह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवली.
अध्यक्षय मनोगतातून जयवंन्तराव काळे यांनी साप्ताहिक आत्मबल ने बातमी शी कधी तडजोड केली नाही. जे सत्य आहे ते निर्भीडपणे छापले आणि म्हणून या सोहळ्याला ही सर्व क्षेत्रातील मंडळी इथे आली आहे. हा विस्वास या साप्ताहिकाणे कमावला असे भाष्य केले. प्रा. वसंतरावजी पुरके यांनी विविधग उदाहरण|चा दाखला देतं खुमासदार शैलीत मनोगत वेक्त केले. पत्रकारिता हे एक व्रत आहे. बंडखोर अभिव्यक्ती ला देखील लोकशाही मध्ये अवकाश असला पाहिजे. आज तो भेटतो का ? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याची भावना वेक्त केली. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. दर्जेदार बातमी उत्कृष्ट दिवाळी अंक हे साप्ताहिक आत्मबल चे वेगळेपण असल्याचे भाष्य त्यांनी केले.
आ. प्रा. डॉ. अशोकरावजी उईके यांनी साप्ताहिक आत्मबल हे नावाप्रमाणे जनतेला आपले वाटले. हे मोठे यश आहे. सम्पादकं मंगेशभाऊ राऊत यांनी स्व. विवेकभाऊ राऊत यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कार्याला मोठ्या हिरीरीने पुढे नेले. याचे करावे तेव्हढे कौतुक कमी होईल अशी भावना वेक्त केली. वसंतराव घुईखेडकर यांनी वर्तमानपत्र श्रुष्टी समोरील आव्हाने व पत्रकारांची जबाबदारी तथा समाजाचे सहकार्य यावर प्रकाश टाकला. प्रवीणभाऊ देशमुख यांनी साप्ताहिक आत्मबल हा माझा परिवार आहे. आज या कार्यक्रमात येऊन स्वतः च्या घरी आल्यासारखे वाटले अशी आत्मिक प्रतिक्रिया दिली.
अनिल खडसे यांनी ग्रामीण भागातील युवकांनी u. P. S.c. चा डोळसपणे अंगीकार करावा. या साठी परिश्रम व योग्य नियोजन गरजेचे असल्यावर भर दिला. ऍड. प्रफुल्लभाऊ मानकर यांनी दिवाळी अंकाला शुभेच्छा देतं असतांनाच शेतकऱ्यांच्या विविध समश्याना वाचा फोडली. दादाराव राऊत यांनी लोकशाही वेवस्था खरेच जनतेला न्याय देऊ शकते काय यांचा विचार करण्याची वेळ आल्याचे वक्तव्य करून एक मोठा प्रश्न वेवस्थसमोर उपस्थित केला. तालुका पत्रकारं संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ रोहणकर,मेडिकल असोसिएशन चे तालुकाध्यक्ष विनयभाऊ मुणोत यांनीही साप्ताहिक आत्मबल दर्जेदार बातमी करीता ओळखले जाते असे समयोपचित विचार मांडले.
सकाळी ठीक 10:30 ला या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्तविक अशोकरावजी राऊत यांनी केले. दिवाळी अंकातील प्रभावशाली वेक्तीच्या मुलाखती उत्कृष्ट साहित्य, सुंदर मुखपृष्ठ याचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे संचलन मनिषभाऊ काळे यांनी व्यक्त केले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...