खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
'काव्यपुष्पांची' उधळण करीत 'पाझर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन व साहित्य सन्मान सोहळा
वणी: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी नागपूर येथे (दि.२९ रोजी) जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा (बु.) येथील सहाय्यक शिक्षिका सौ. आशा कोवे गेडाम यांच्या *पाझर* या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या राज्यातील ३० साहित्यिकांचा 'साहित्य सेवा सन्मान' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आशा कोवे यांना त्यांच्या साहित्याची दाखल घेऊन डॉ.अनिल पावशेकर यांच्या हस्ते 'साहित्य सेवा सन्मान' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या प्रकाशन समारंभास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व नाट्यलेखक दादाकांत धनविजय, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अनिल पावशेकर, प्रा.आनंद मांजरखेडे, डॉ. सोहन चवरे, प्रमुख पाहुणे म्हणून मा. मयुर निमजे, दि फ्री मिडीया न्यूजच्या पत्रकार रेणुका किन्हेकर, विश्वस्त अरविंद उरकुडे साहित्यपीठावर उपस्थित होते. प्रतिमा पूजन व पुष्पहार अपर्ण करून समारंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या कविता संग्रहाचे लोकार्पण व साहित्यिकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथसंपदा देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेल्या ३० साहित्यिकांना 'साहित्य सेवा सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुपार सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. अध्यक्ष म्हणून स्वाती मराडे, पुणे तर प्रमुख पाहुणे नागोराव कोम्पलवार उपस्थित होते. १५ निमंत्रित कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार रचना सादर करून सभागृहात उपस्थित असलेल्या काव्यरसिकांची मने जिंकली. मान्यवरांनी आपापल्या मार्दर्शनातून व्यक्त होत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीची तळमळ व्यक्त केली. *पाझर* या काव्य संग्रहाकाचे लोकार्पण व साहित्य सेवा सन्मान सोहळा 'काव्यपुष्पाची' उधळण करीत सरला.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्र संचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार चित्रपट निर्माती कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांनी मानले. कवयित्री सुधा मेश्राम, तारका रूखमोडे, ब्रेंज हब, दि फ्री मिडीया न्यूज यांनी विशेष सहकार्य केले. या समारभांस राज्यातील काव्यरसिक व साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...