Home / महाराष्ट्र / मराठवाडा / लातुर येथे सक्तीच्या...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

लातुर येथे सक्तीच्या कोरोना लसीकरणाविरोधात निदर्शने..!

लातुर येथे सक्तीच्या कोरोना लसीकरणाविरोधात निदर्शने..!

(नवनाथ रेपे) बीड : सरकार कोरोना लसीकरण सक्तीचे आदेश काढत असल्यामुळे संविधानिक मुल्याचे हनन होत असल्यामुळे बेकायदा केलेली लसीकरणाची सक्ती व नागरीकांनावरती लादले गेलेले निर्बध राज्यसकारने तात्काळ मागे घ्यावेत यासाठी बहुजन मुक्ती पार्टी पाच टप्यात अंदोलन करत असून काल लातुरात त्यातील पहीला दुसरा टप्पा लातुर मधील मुख्य असलेल्या गांधी चौक येथे  राज्यव्यापी निदर्शने देऊन त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर देऊन निदर्शने पुर्ण केला.

एकीकडे लस बंधनकारक नाही असे न्यायालयाचे आदेश असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी लसीकरण सक्तीचे आदेश काढत आहेत त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जो लसीकरण सक्ती विरोधात अंदोलनाचा दुसरा टप्पा होता त्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर लस सक्तीच्या विरोधात निदर्शने देऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री, मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्याचा होता. या दुस-या टप्पयात आज लातुर येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काही सविस्तर मागण्या केल्या आहे.

१. लसीकरण झालेल्या लोकांना कोरोना होणार नाही किंवा इतर आजार उद्वभवणार नाही अशी तज्ञानी तपासणी केली असेल तो अहवाल द्यावा.
२. सदर कोरोना लसीमध्ये कोणते घटक आहेत ते लिखित स्वरूपात द्यावे.
३. कोवीड आजार अस्तित्वात असल्याचे वैज्ञानिक माहीती असेल ते लिखित स्वरुपातील पुरावे द्यावेत.
४. लाँकडाऊन केल्यास कोरोना होणार नाही त्यासाठी काही वैज्ञानिक पुरावा असेल तर तो द्यावा.
५. कोरोनाचे निदान करण्यासाठी वाफरण्यात येणारी आरटीपीसीआर टेस्ट किट कितपत खात्रीशीर आहे ?ती किट विषाणू शोधू शकते का ?
६. कोरोना लस कोरोना रोखण्यासाठी सक्षम आहे का ? याबाबत सविस्तर माहीती द्यावी.
७. कोरोना लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोना होणार नाही तसेच लस घेतल्यास त्यांना लसीमुळे इतर आजराची लागण होणार नाही याबबतचे हमीपत्र प्रशासनाकडून लिखित स्वरुपात देण्यात यावे.
८. एखाद्या व्यक्तीने घस घेऊन तो दगावला तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सहायत्ता निधी देण्याचे हमीपत्र महाराष्ट्र सरकारने द्यावे.
 ९. भारतीय घटनेच्या कलम २१ नुसार भारतीय नागरीकांना इलाज करून घेणे अथवा न करून घेणे यासंदर्भात पुर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाऊ शकत नाही तरीपण लसीकरण सक्ती करणारे आदेश जिल्हाधिकारी कोणत्या आधारावर काढत आहे हे लिखित द्यावे.
१०. जिल्हाधिकारी यांनी लसीकरण सक्तीचे आदेश काढणे म्हणजे संविधानाच्या कलम २१ चे सरळसरळ उल्लंघन आहे, या उल्लंघन केलेल्या अधिका-यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
अशा मागण्या असलेले निवेदन आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने लातुर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर, उपाध्यक्ष बडुसिंग भाट, सचिव जलिल अत्तार, अँड. प्रमोद रुपवते, विठ्ठल कांबळे, प्रभाकर करंजीकर व पत्रकार नवनाथ रेपे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...