Home / चंद्रपूर - जिल्हा / स्वाभिमान योजनेअंतर्गत...

चंद्रपूर - जिल्हा

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिन खरेदीचे प्रस्ताव सादर करावे..

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिन खरेदीचे प्रस्ताव सादर करावे..

उमेश तपासे (चंद्रपूर) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भूमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा यासाठी त्यांना कसण्याकरिता 4 एकर जिरायती किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून द्यावयाची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असून विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2020-21 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कार्यालयास सादर करावे असे आवाहन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी केले आहे

इच्छुक शेतकरी, जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास समंती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा ७/१२, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रीयेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरु नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.

सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दि. 30 जून 2021 पर्यंत संपर्क साधावा असे चंद्रपूर,समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...