वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : शहरातील जटपुरा गेट, पठाणपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूंच्या नावासह वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील प्रस्ताव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने नामंजूर केला. मनपाच्या राणी हिराई सभागृहात 30 डिसेंबर रोजी महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती.
शहरातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केलेले आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, महानगरपालिका आयुक्त या समितीमध्ये सदस्य आहेत.
चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात चौक, रस्ते, नगर इत्यादींना कोणतेही जातीवाचक नांवे देण्यात आलेली नाही, याबाबत कार्यालयीन पत्र दिनांक २५/०३/२०२१ अन्वये शासनास माहिती सादर करण्यात आलेली होती. मात्र, शासकीय दस्तऐवजात नोंदी नसलेले आणि समाजामध्ये प्रचलित असलेल्या जातीवाचक नावाच्या ठिकाणी शासकीय दस्तऐवजाप्रमाणे नावाचे नामफलक लावण्यात यावे, याबाबत कार्यवाही करण्याचे कळविले होते. त्यानुसार जातीवाचक नावांचे ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली.
मनपाचे कर विभाग व निवडणूक विभाग यांच्याकडून जटपूरा, पठाणपूरा, माना टेकडी व बंगाली कॅम्प, शास्त्रीनगर प्रभाग ही नांवे जातीवाचक असल्याचे अभिप्राय प्राप्त झालेले आहे. तसेच स्वच्छता निरिक्षकांची गोंड वस्ती, यादव वस्ती व उडिया वस्ती, इराणी मोहल्ला आदी नावे जातीवाचक असल्याचे सादर केले. ही संपूर्ण नावे बदलून त्या ठिकाणी नवीन नावे देण्यास संदर्भातला विषय आज आमसभेत ठेवण्यात आला होता.
मात्र, सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करीत चंद्रपूर शहरातील कोणतीही नावे बदलण्यात येऊ नयेत, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पीठासीन अधिकारी यांनी सदर प्रस्ताव नामंजूर करण्याचे निर्देशित केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...