Home / चंद्रपूर - जिल्हा / नगर पंचायत / परिषद व...

चंद्रपूर - जिल्हा

नगर पंचायत / परिषद व ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2021.

नगर पंचायत / परिषद व ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2021.

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

चंद्रपूर दि. 16 डिसेंबर (जिल्हा-प्रतिनिधी ): चंद्रपूर जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीमध्ये 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाचे दिवशी कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येत असून या कालावधीत कोरडा दिवस पाळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

सावली,पोंभूर्णा,गोंडपिंपरी,कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही या नगरपंचायतीचा व नागभीड नगरपरिषद पोटनिवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने  मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान व बुधवार दि. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या मतदान व मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक व नागभीड नगरपरिषदेच्या पोटनिवडणूकीकरीता मतदान व मतमोजणी निमित्त येथील सर्व किरकोळ विक्री अनुज्ञप्त्या, सर्व मद्य, बिअर, ताडी विक्री करिता बंद राहतील.

नगरपरिषद नागभीड तर नगरपंचायत सावली,पोंभुर्णा,गोंडपिपरी,कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत हद्दीतील तसेच, गोंडपिपरी,वरोरा, बल्लारपूर, कोरपना, चिमूर, भद्रावती, राजुरा, मुल, ब्रह्मपुरी, जिवती व नागभीड या तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्य, बिअर तसेच ताडी विक्री अनुज्ञप्त्या सोमवार दि. 20 डिसेंबर ते बुधवार दि.22 डिसेंबर 2021 या तिन्ही दिवसाच्या कालावधीत बंद राहतील. या आदेशाच्या नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांच्याविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची यादी :

गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी, कुडेसावली व विहीरगांव, वरोरा तालुक्यातील सोनेगाव, बोरगाव मो., खापरी, बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली, कोरपना तालुक्यातील अंतरगाव, चिमूर तालुक्यातील पिंपळगाव,येरखेडा, भद्रावती तालुक्यातील बिजोनी, राजुरा तालुक्यातील रामपूर, सिंधी, सुमठाणा, विरुर स्टेशन व सास्ती, मूल तालुक्यातील चिरोली, ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी, कोसंबी खडसमारा, खरकाडा व मेंडकी, जिवती तालुक्यातील लांबोरी व नंदप्पा, नागभीड तालुक्यातील येनोली माल, कोथुळना व सोनोली बुज या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...