शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन, " कुरकुमीन " या घटकाचे प्रमाण जास्त. पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक.
चंद्रपूर: मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये एकूण 148 शेतकऱ्यांमार्फत 250 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. लागवडीकरिता" प्रगती "वाणाची निवड करण्यात आली होती. या वाणाचे उत्पादन 200 ते 230 क्विंटल प्रति हेक्टर मिळाले आहे. तसेच या वानामध्ये "कुरकुमीन" या घटकाचे प्रमाण सुद्धा पारंपरिक वाणाच्या तुलनेत अधिक आढळले आहे. मागील हंगामामध्ये हळदीला बाजारामध्ये चांगला भाव मिळाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रगती या वाणाची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भात , कापूस , तूर , सोयाबीन यांचा सामावेश होतो . पिक पद्धतीमध्ये बदल ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.त्यासाठी extension activities (क्रियाकलाप) आणि हॅन्ड होल्डिंग अत्यंत आवश्यक आहे. त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हळद लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले असून बियाणे, इतर निविष्ठा तसेच हळद निर्मितीसाठी आवश्यक उपकरणे यासाठी अनुदान दिले जाते.
कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक अशी हळदीची आोळख आहे. आहार, औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधन आणि धार्मिक विधी यासाठी हळदीचा वापर होतो . जमिनीचा कस वाढविणे ,कीड व रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असणे तसेच रानडुकरांचा उपद्रव कमी असतो चंद्रपूरसारख्या जंगलव्याप्त प्रदेशात हे विशेष मह्त्वाचे आहे. हळद पिकाचे फायदे सुद्धा खूप आहेत. जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता पुढील काळात पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय असणार आहे.
हळद लागवडीकरिता प्रगती या वाणाचे बियाणे शेतकरी उत्पादक कंपनी कवडू अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, मुल, विक्रेते: नितेश येनपरेड्डिवार 9763427506.
संगोपन फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मुल विक्रेते:श्री.सहारे 9067357835. ग्रामसमृद्धी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, चंदनखेडा, विक्रेते: महेश नागापुरे 8668959375. कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी,वरोरा, विक्रेते:बालाजी धोबे 9860117436 , मानिकादेवी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी सालोरी, विक्रेते: सुनील बावणे 9763234836. कृषकोन्नती कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, टेंमुर्डा विक्रेते:श्री.मरस्कोल्हे 8007748175. बाखर्डी फार्मर प्रोड्युसर कंपनी कोरपना,विक्रेते: संदीप काकडे 8806758903 यांचेकडे उपलब्ध असून संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या जवळच्या FPO कंपनीकडून बियाणे खरेदी करावे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...