Home / चंद्रपूर - जिल्हा / गांधी जयंतीपासून जिल्ह्यात...

चंद्रपूर - जिल्हा

गांधी जयंतीपासून जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव’ अभियान

गांधी जयंतीपासून जिल्ह्यात ‘समस्या मुक्त गाव’ अभियान

पालकमंत्र्यांच्या हस्ते पालेबारसा येथे शुभारंभ

चंद्रपूर, दि. 28 :  ‘खेड्याकडे चला’ असा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिला होता. त्याचे औचित्य साधून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ‘समस्या मुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. गावातील समस्या गावातच सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन 2 ऑक्टोबर रोजी सावली तालुक्यातील पालेबारसा उपस्थित राहणार असून या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या अभियानामध्ये पालेबारसा गावासोबतच परिसरातील मंगरमेंढा,सायखेडा,उसरपार चक, उसरपार तुकुम, जानकापूर, बारसागड, मेहा खुर्द, सावंगी दीक्षित, असोला चक, भानापूर या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्यासोबतच उपविभाग व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार असून वरील नमूद गावातील नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या समस्या या अभियानाच्या माध्यमातून मांडणे आवश्यक आहे. या अभियानामध्ये गावातील काही पात्र लाभार्थ्यांना सेवा/लाभाचे वाटप पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. पालेबारसा व परिसरातील नागरिकांनी दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा येथे उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...