Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भर वस्तीत सुरू असलेल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भर वस्तीत सुरू असलेल्या मटका अड्यावर छापा..!

भर वस्तीत सुरू असलेल्या मटका अड्यावर छापा..!

11 ताब्यात, 2लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त 

वणी (प्रतिनिधी ) : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सावरकर चौका मधील एका घरात सुरू असलेल्या मटका अडा वणी पोलिसांनी धाड टाकून 11 जणांना ताब्यात घेतले.त्यांच्या जवळून 2 लाख 74 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकबर हनिफ शेख (43)रा.शास्त्रीनगर, मोसीन राजू शेख (23) रा. एकतानगर, दीपक शंकर गांडलेवार (24) रंगनाथ नगर, नावेद आरिफ शेख (28) रा. वरोरा, राहुल किशोर गावंडे (26) रा. शास्त्रीनगर, शेख गफार शेख सत्तार (34) शास्त्रीनगर, अकरम अकबर बेग (32) रा. शास्त्रीनगर, सादिक शेख हमीद शेख (30) सावरकर चौक, समीर शेख हसन शेख रा.वणी, सुशील मदनकुमार अग्रवाल रा. एकतानगर, मुस्तफा खान मुसा खान (19) रा. वणी असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

सावरकर चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या सादिक शेख याच्या घरात मटका अडा सुरू असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना दि. 3 जुलै ला दुपारी 3 वाजताचे सुमारास मिळाली. त्यावरून डीबी पथकाने या घरावर धाड टाकली असता जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आल्याने 11 जणांना ताब्यात घेऊन मोबाईल, नगदी रोकड, दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख 74 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर यांनी केली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...