वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आ. मुनगंटीवार यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला उपाययोजनांचा आढावा, अतिरिक्त फॉगींग मशीन खरेदीसाठी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव पाठवावे.
चंद्रपूर जिल्हयात डेंग्यु, मलेरिया या साथींच्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यु ही अतिशय चिंतेची बाब आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर जिल्हा परिषद तसेच सर्व नगरपालिकांच्या प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या, प्रामुख्याने जनजागरण मोहीम प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी आदींवर भर द्यावा. अतिरिक्त फॉगींग मशीनची खरेदी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी खनिज विकास निधीच्या माध्यमातुन जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव सादर करावे, आपण स्वतः जिल्हाधिका-यांशी चर्चा करून यासंदर्भात मान्यता मिळवू, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हयातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णवाहीकेशिवाय राहता कामा नये
दिनांक २३ ऑगस्ट रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी डेंग्यु, मलेरिया या साथींच्या आजारासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत ऑनलाईन आढावा बैठक घेत लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सेठी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, उपमहापौर राहूल पावडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय सरनाईक, सिध्दार्थ मेश्राम, मुलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, नगरसेवकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी डेंग्यु, मलेरिया या साथींच्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आढावा घेतला. ग्रामीण भागात, मनपा क्षेत्रात तसेच नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात राबविण्याच्या उपाययोजनांच्या दृष्टीने फॉगींगची व्यवस्था, फवारणीची व्यवस्था, आवश्यकतेनुसार मलेरिया व फायलेरिया वर्करची उपलब्धता, रूग्णवाहीकांची उपलब्धता, आवश्यक औषधांची उपलब्धता, रक्त पुरवठा, कर्मचारी अपुरे असल्यास रोजंदारी कर्मचा-यांची व्यवस्था, ग्राम पंचायतींना स्वच्छतेसाठी खनिज विकास निधीतुन निधी उपलब्ध करता येईल याबाबत विशेष लक्ष्य देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनी जागरूकपणे लक्ष्य देण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी प्रतिपादीत केली. जिल्हयातील कोणतेही प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णवाहीकेशिवाय राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन करण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह तातडीने बैठक घेवून जिल्हाधिका-यांकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी दिली. यासंदर्भात आपण जिल्हयातील सर्व वैद्यकिय अधिका-यांशी तातडीने चर्चा करून उपाययोजनेची दिशा निश्चीत करू असेही श्रीमती सेठी म्हणाल्या.
चंद्रपूर मनपा क्षेत्रात मनपाने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या
जिल्हयात डेंग्युच्या एकूण रूग्णसंख्येपैकी ६९ रूग्ण महानगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे यासंदर्भात चंद्रपूर महानगरात गंभीरपणे उपाययोजना करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या १० फॉगींग मशीन व्यतिरिक्त ३० फॉगींग मशीन आणखी खरेदी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना हॉस्पीटल डेग्यु, मलेरीया रूग्णांसाठी वापरावे अशी सुचना देखील त्यांनी यावेळी केली. महानगरात ३६ नव्या फॉगींग मशीन खरेदीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवावा, शहरात एकाच वेळी सर्वदूर फॉगींग होईल यावर विशेष भर द्यावा, असेही ते म्हणाले. महानगरपालिकेने पुढाकार घेवून रक्तदान शिबीर आयोजित करण्याच्या सुचना देखील त्यांनी वेळी केली. चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातुन सातही झोनमध्ये गृहभेटी देवून जनजागरण करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त राजेश मोहीते यांनी दिले. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातुन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल अशी ग्वाही महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली. यावेळी माजी महापौर सौ. अंजली घोटेकर यांनीही काही उपाययोजना सुचविल्या.
बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात सर्व प्रभागांमध्ये उत्तमरित्या फॉगींग होण्याच्या दृष्टीने अतिरिक्त फॉगींग मशीन खरेदीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी मुख्याधिका-यांना दिले. मुख्याधिकारी सरनाईक यांनी त्वरीत सदर प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले. पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी माहिती दिली.
जनजागरणाच्या दृष्टीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दर्शनी भागामध्ये आवाहन करणारे मोठे फलक लावावे, पदाधिका-यांनी जनतेला आवाहन करणारे व्हिडीओ तयार करून ते समाज माध्यमांवर प्रसारित करावे व या प्रक्रियेत प्रामुख्याने आकाशवाणी या माध्यमाचा उपयोग करावा, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...