Home / चंद्रपूर - जिल्हा / प्रेस संपादक व पत्रकार...

चंद्रपूर - जिल्हा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा कार्यकारीणी नियुक्ती पत्र वितरण सोहळा संपन्न

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा कार्यकारीणी नियुक्ती पत्र वितरण सोहळा संपन्न

पत्रकार बांधवाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करुया-प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर यांचे आवाहन

नाशिक (वृत्तसंस्था) - लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार बांधव हा समाजासाठी सातत्याने अविरत व अहोरात्र परिश्रम घेत असतो. प्रसंगी स्वतः चे कुंटुब, आरोग्य व अन्य बाबीकडे तो दुर्लक्ष करतो.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ही संघटना याच गोष्टीचे भान ठेवत काम करते. म्हणून संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ही पत्रकार बांधवाचें हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करावे असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी केले आहे. 

नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने नाशिक येथील श्रीकृष्ण लाँन्स, द्वारका येथे आयोजित नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती पत्र वितरण व पदग्रहण सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी व्यासपिठावर संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जैन, जिल्हा संपर्कप्रमुख साजीद शेख आदी उपस्थित होते.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार व तणावमुक्त जीवन या विषयावर प्रजापती ब्रम्हकुमारी सेवा संघाचे वतीने पत्रकार बांधवांना तणाव मुक्त जीवनाचे महत्त्व, उपाय आदी विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी यांनी आपल्या पुढील वाटचालीच्या योजना विशद करताना संघटना वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

जिल्हा पदाधिकारी सोमनाथ क्षत्रिय, साजिद शेख व शरदचंद्र खैरनार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत आगामी काळात भरीव काम करण्याचे आश्वासन प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर यांना दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे यांनी, सुत्रसंचालन शरदचंद्र खैरनार यांनी तर आभार जिल्हा संघटक मनोहर भावनाथ यांनी मानले.

   कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर यांचेसह जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे, शरदचंद्र खैरनार, युवा अध्यक्ष सोमनाथ क्षत्रिय, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जैन, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, जिल्हा संपर्क प्रमुख साजीद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल खरे, जाहिद शेख, जिल्हा संघटक मनोहर भावनाथ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील, अनिल केदारे, श्रीमती गायकवाड, ॲड.कांबळे आदीसह असंख्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...