आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेना ताकदीने उभी होत असून तालुका शाखा विस्तारासाठी पोंभूर्णा तालुका शाखा कार्यकारिणी गठीत करुन घोषित करण्यासंबंधी दिनांक ०९.११.२०२१ मंगळवारला बाजार समिती येथे दुपारी १.०० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे, जिल्हा मार्गदर्शक सुरेश नारनवरे, व प्रमुख अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार तर प्रमुख अथिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा युवा पँथर भैय्याजी मानकर, निशाल मेश्राम, सुमीत कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात बौद्ध, आदिवासी व मागासवर्गीयांवर वाढते हल्ले बघता महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार सातत्याने मनुवादी, तालीबानी, दादागिरी व विकृत मानसिकते विरोधात संघर्ष करीत आहेत. या निच विकृतीचा खात्मा करण्यासाठी जिवाची पर्वा न करता रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या संघर्षाची ठिणगी चंद्रपूर जिल्हात सुद्धा पोहचली असून जिथे जिथे अन्याय अत्याचार होत आहेत त्या विरोधात ऑल इंडिया पँथर सेना ताकदीने लढत असून न्याय मिळवून देत आहेत. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेनेत मोठ्या प्रमाणावर युवावर्ग समाविष्ठ होत असून आणि आंबेडकर वादी आंदोलनाचा हिस्सा होत आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर युवावर्ग पँथर सेनेत दाखल होण्याच्या मार्गावर असतांना तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भात व विविध विषयावर चर्चा व पुढील कार्य करण्या संबधाने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला तालुक्यातील बाबासाहेब, शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, अण्णा भाऊ साठे, व महापुरषांना ऑयडाल मानणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचीही दादागिरी, तालीबानी व्यवस्था चालू देणार नाही असेही स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...