खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी(प्रतिनिधी): मंगळवारी मध्यरात्रीही पोलिसांनी खडबडा मोहल्ला येथे धाड टाकून . १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केली मालवाहू वाहनात कोंबून असलेल्या या जनावरांना तेलगाना प्रांतात अवैध विक्री करिता नेण्यात येणार होते जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पथकासह त्याठिकाणी धाड टाकून मालवाहू वाहनाला ताब्यात घेत १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका केली
शहराच्या खडबडा मोहल्ला येथील ईदगाहच्या मागील भागातून गोवंश जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी काल मध्यरात्री २-४५ वाजताच्या सुमारास गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी धाड टाकली. तेथे एक मालवाहू वाहन पोलिसांना उभे दिसले. पोलिसांनी त्या मालवाहू वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये १४ गोवंश जनावरे कोंबून होती. कत्तली करिता तेलगाना राज्यत तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले. पोलिसांनी मालवाहू वाहन ताब्यात घेतले असून वाहन मालक व इतर काही जण घटनास्थळा वरुन पळुन गेले, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १४ गोवंश जनावरे व एक MH ३४ AB २४७८ हे मालवाहू वाहन असा एकुण 4 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १४ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता करत त्यांना रासा गोरक्षण संस्थेकडे देण्यात आले. गोवंश जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी म.प्रा.स.का. १९७६ अंतर्गत कलम ५(अ)(ब),९, ९(अ), प्रा.छ.अ. १९६० अंतर्गत कलम ११(१)(क)(घ)(ड)(च)(झ) व मो.वा.का. च्या सहकलम १३०, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, पीएसआय शिवाजी टिपूर्णे, पोउपनि हिरे, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना अशोक टेकाडे, गजानन भांदीकर, हरिन्द्रकुमार भारती, पोकॉ. विशाल गेडाम, विजय राठोड, शुभम सोनुले, शंकर चौधरी, यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सुदर्शन वानोळे व वणी पोलिस स्टेशन चे ईतर कर्मचारी तपास करीत आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...