खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (विशेष प्रतिनिधी): शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचलित,लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हितगुज( commune ) अंतर्गत "छायाचित्र व चलचित्र कार्यशाळा" घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी करियर ओरिएंटेड शिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्य संबंधी जागरूक असायला पाहिजे. व नवीन कौशल्य प्राप्त करायला हवेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नीलिमा दवणे यांनी केले, विद्यार्थ्याना कौशल्य पुर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. सागर मुने यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना छायाचित्र क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मेहनत, जिद्द, प्रामाणिकता, नियोजन व सगळ्यात महत्वाचे कौशल्य पाहिजे, तरच या व्यवसायात आर्थिक उन्नती आहे तसेच व्हिडीओ एडिटिंग, फोटो अल्बम डिझाइन या क्षेत्रात खूप मागणी व उत्पन्न आहे. असे पहिल्या मार्गदर्शन सत्रात सांगितले.
दुसऱ्या सत्रात प्रात्यक्षिक करून फोटो कसे काढायचे याबाबत वणी नगरातील नामवंत फोटोग्राफर प्रशिक्षक रवींद्र काळे ,प्रमोद नवले, सागर मुने व सहकारी जीवन पंधरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. फोटोग्राफि कशा पद्धतीने करायची आणि व्हिडिओ कसे रेकॉर्ड करावेत आणि एडिट कसे करावेत. याबद्दलचे कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रशिक्षण घेणाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत, सर्व बारकावे माहिती करून घेतली व एक महिना प्रशिक्षण देण्यात यावे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशन घोगरे यांनी केले तर वैष्णवी निखाडे हिने आभार मानले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...