Home / चंद्रपूर - जिल्हा / आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा

आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार

आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार

लवकरच आठवडी बाजार सुरू होतील – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आश्वासन

चंद्रपूर(जिल्हा-प्रतिनिधी ) : राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर दुसऱ्या लाटे दरम्यान लागु करण्‍यात आलेल्‍या निर्बंधा पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या कड़े केली आहे.राज्य सरकारचे मार्गदर्शन मागवुन  आठवडी बाजार सुरू करण्‍यात येतील असे आश्‍वासन श्री. गुल्हाने  यांनी आ. मुनगंटीवार यांना दिलेले आहे.

राज्‍यात रुग्ण संख्येत , मृत्यु संख्येत मोठया प्रमाणावर घट झाली आहे. रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नागरिकांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा समजला जाणारा आठवडी बाजार मात्र अद्याप सुरू झालेला नाही.  अद्याप आठवडी बाजार बंद असल्‍यामुळे यावर अवलंबुन असलेल्‍या व्‍यावसायीकांना व्‍यवसायाअभावी आर्थीक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्‍याचप्रमाणे नागरिकांना सुध्‍दा गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...