Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / उपोषणकर्ते तरुणांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

उपोषणकर्ते तरुणांनी मागितली आत्मदहन करण्याची परवानगी..!

उपोषणकर्ते तरुणांनी मागितली आत्मदहन करण्याची परवानगी..!
ads images

 प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांच्या नेतृत्वाखाली इस्पात कंपनीत दिली धडक 

Advertisement

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): मुकुटबन व परिसरातील सुशिक्षीत बेरोजगार व प्रकल्पग्रस्त तरुणांनी इस्पात कोळसा खान व सिमेंट कंपनीत रोजगार मिळावे याकरिता 3 दिवस उपोषण केले होते. कंपनीच्या लेखी आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले. लेखी आश्वासनात इस्पात कोळसा कंपनीने 15 ऑगस्ट पूर्वी 20, सप्टेंबर मध्ये 10 व ऑक्टोबर मध्ये 10 असे एकूण 40 तरुणांना नौकरीवर घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. 22 दिवस लोटूनही  कंपनीने एकाही तरुणाला नौकरीवर न घेता तीन ग्रामपंचायत कडून इतर तरुणांची यादी घेऊन उपोषणकर्ते व नवीन यादितील तरुणांमध्ये झगडे लावण्याचा प्रकार चालू केला आहे. उपोषणकर्ते तरुण गेल्या 20 दिवसापासून पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकले परंतु कंपनी काहीच बोलण्यास तयार नाही.  खाजगी कंपनीचे अधिकारी व राजकीय दडपणामुळे तरुणांना नौकरीवर घेत नसल्याने बेरोजगार तरुण हतबल झाले व अखेर तरुणांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. व तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याची परवानगी मागितली.

Advertisement

 बेरोजगार तरुण कंपनीतील अधिकारी यांच्याशी नौकरी बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीचे व धमकविण्याची भाषा बोलत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणात कंपणीबाबत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. राजकीय पुढारी व कंपनी यांच्या राजकारणामुळे तरुण युवकांचे भविष्य अंधारात जात आहे. 

तरुणांवर होणाऱ्या अन्याया बाबत ची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांना मिळताच ते 12 वाजता मुकुटबन आले व तरुणांना घेऊन इस्पात कोळसा खानच्या मुख्य गेटवर पोहचले व कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याकरिता मॅनेजर याना बोलविण्यास सांगितले. कंपणीचे अधिकारी नसल्याचे सांगण्यात येताच पवार प्रचंड संतापले व आम्हाला 11 वाजता भेटण्याचे सांगीतल्यानंतर इथे हजर का नाही ? असा संतप्त प्रश्न केला. त्यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून बोलणे झाल्यानंतर तसेच 1 सप्टेंबर पासून बेरोजगार मुलांची ट्रायल घेऊन नौकरीवर लावण्याच्या आश्वासनानंतर सर्व तरुण परतले. 1 सप्टेंबरला मुलांना नौकरीवर न घेतल्यास  सर्व तरुण तारीख ठरवून तहसील कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार रामगुंडे व ठाणेदार अजित जाधव यांना देण्यात आले. त्यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार ,प्रकाश म्याकलवार, आसिफ कुरेशी,अनिल मुजगुले, आझाद उदकवार,सुनील जींनावार,उमेश पोतराजे,अनुप धगडी, जयंत उदकवार,प्रदीप वैद्य,गजानन नगराळे,गजानन वासाडे,पंढरी पेटकर,राजू धोटे,गजानन आडे सह शेकडो तरुण उपस्थित होते. कंपनीच्या मुख्य द्वारावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणेदार अजित जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, गणेश मोरे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...