Home / चंद्रपूर - जिल्हा / लसीकरणाचे दोन्ही डोज...

चंद्रपूर - जिल्हा

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करण्यासाठी गांभिर्याने लक्ष द्या

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करण्यासाठी गांभिर्याने लक्ष द्या

जिल्हाधिका-यांचे तालुका यंत्रणेला निर्देश

चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : जिल्ह्यात आजपावेतो 91 टक्के नागरिकांचा पहिला डोज पूर्ण झाला असला तरी कालावधी होऊनसुध्दा दुसरा डोज घेणा-यांची संख्या कमी आहे. जगातील अनेक देशात ओमॉयक्रॉनचा शिरकाव झाला आहे. आपल्याकडेसुध्दा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमॉयक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता पात्र लाभार्थ्यांचे दोन्ही डोज त्वरीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुका यंत्रणांनी गांभिर्याने लक्ष देऊन त्वरीत लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपा आयुक्त राजेश मोहिते, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, मनपाच्या डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.

ओमॉयक्रॉनबाबत कुणीही गाफील राहू नये, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जगामध्ये ओमॉयक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा संभाव्य धोका आपल्याकडेसुध्दा राहू शकतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे दोन्ही डोज पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. त्यासाठी लसीकरण सत्रांचे योग्य ठिकाणी नियोजन झाले पाहिजे. ज्या गावात जास्त लाभार्थी शिल्लक आहेत, अशा ठिकाणी सत्र आयोजित करा. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांमार्फत एक-दोन दिवसांपूर्वीच नागरिकांना माहिती द्या. कालावधी झालेल्या मात्र दुसरा डोज न घेतलेल्या नागरिकांच्या याद्या शिक्षकांकडे देऊन त्यांना उद्दिष्ट ठरवून द्या. याबाबत त्वरीत आदेश काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लसीकरणाचे सत्र योग्य ठिकाणी आयोजित होते की नाही, याकडे तालुका आरोग्य अधिका-यांनी लक्ष द्यावे. यात चालढकलपण करू नका. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी याबाबत नियमित पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेता आपापल्या क्षेत्रात कोव्हीड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालये आदी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असले पाहिजे. तसेच औषधीसाठा, रुग्णखाटा, ऑक्सीजन सिलींडर, व्हेंटीलेटर तयार ठेवा. ओमॉयक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने विलगीकरणाची सुविधा व्हावी, यासाठी शहरातील किंवा तालुक्यातील मोठे सभागृह, हॉलचे सीसीसीकरीता नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिका-यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधून अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेतली. 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...