Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्हा परिषद प्राथमिक...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्झा(ब्रम्हपुरी) शाळेच्या पटांगणाची दयनीय अवस्था

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्झा(ब्रम्हपुरी) शाळेच्या पटांगणाची दयनीय अवस्था

शहरी भागातील कुर्झा येथे जिल्हा परिषद.शाळेची अवस्था बघता ग्रामीण भागाचे काय...?

ब्रम्हपुरी : मानवाच्या उत्कर्षापासून क्रीडा त्याच्या जीवनाचा एक अमूल्य भाग आहे, मुलांनी बाहेर मोकळ्या हवेत खेळणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचे असते, मैदानी खेळ खेळल्याने मुलांच्या आंतरिक कौशल्याचा विकास होतो व त्यांचे स्वास्थ्य ठीक राहून वाढ झपाट्याने होते, सरकार ने शैक्षणिक बाबतीत मुलांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मोफत सरकारी शाळा काढल्यात तर सोबत पटांगण उपलब्ध करून देत मुलांचे सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न केले मात्र कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणा वर मोठ-मोठे खाचखडगे,तणशीचे ढीगार, जनावरे, वाहनं,शेणाने पटांगणाचे तीन-तेरा वाजल्याचे निदर्शनात येत आहे.

पटांगणावरील दयनीय अवस्थेत बाबत विचारणा केली असता मुख्याध्यापिका समर्थ मॅडम व शिक्षक श्री तिघरे यांनी,आम्ही सूचना देऊनही अतिक्रमण धारक, अतिक्रमण काढायला तयार नाही व उर्मट वागतात त्यामुळे आम्ही त्यांना विचारणे सोडले. स्थानिक नगरसेवकाकडे सहकार्य मागितले असता त्यांनी शालेय परिसराच्या बाहेरील भागात रस्ता व नाली चे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पटांगणाचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिल्याचे सांगितले.

 एकंदरीत सदर समस्येची कुठेही लेखी तक्रार दिल्याचे शाळा समिती तर्फे निदर्शनात येत नाही, तर वरिष्ठांकडे कुठलीही तक्रार दिल्याचे स्पष्ट होत नाही. कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने पटांगण परिसरात घाण आणी गंदगी चे साम्राज्य वाढत असून,शालेय मुलांच्या मूलभूत हक्काशी व आरोग्याशी खेळण्याचा अक्षम्य गुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्झा वार्ड ब्रह्मपुरी येथे होतं आहे.

संबंधित गंभीर समस्येकडे तालुका व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आळा घालावा अशी मागणी कुर्झा  वार्डातील नागरिकांकडून होत आहे

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...