*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
Reg No. MH-36-0010493
अमरावती दानापूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. आज पीडितांची भेट घेतली, जून महिन्यात झालेल्या अट्रोसिटी ऍक्ट मधील आरोपी अद्याप अटक नाहीत, बौद्ध मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी अटक नाहीत, 4 महिन्यांपासून शेतीला जाणारा रस्ता अडवलेला आहे, तो ही तहसीलदार उघडून देत नाही. ठाणेदार, डीवायएसपी दखल घेत नाही, तहसीलदार दखल घेत नाहीत म्हणून अखेर हे गावच नको. जिथे जातीयेतून सामाजिक अत्याचार होत आहे तिथे राहायचे नको म्हणत आधी गावात उपोषण केलं. गावात 15 दिवस उपोषण सुरू होत, काँग्रेसचा माजी आमदार त्यांना भेट देतो आणि उपोषण हटवा अन्यथा ते लोक तुमच्या गंजी पेटवतील म्हणतो. काही तासात बौद्ध मातंगांच्या सोयाबीन गंजी पेटण्यात आली त्यामुळे अखेर हा समूह हतबल होऊन गाव सोडून तलावावर राहायला गेला. पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्तीने या समूहाने आंदोलन मागे घेतले आहे. आता तो घरी आहे.
आज ऑल इंडिया पँथर सेनेनी भेट दिली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनुसूचित जाती जमातीला सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा नवा लढा आम्हाला लढावं लागेल. सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत, गृहमंत्री अमरावतीत असतात तेंव्हा ही घटना घडते. तरी सुद्धा न्याय मिळत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांना दलितांना भेटायला लाज वाटते का?
सुनियोजित कट करून येते खैरलांजी घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. खैरलांजी घडल्यावरच सरकारला जाग येणार आहे का? स्थानिक आमदार भाजपचा आहे तो ही भेटायला आला नाही. आरएसएस चा एक केडर कार्यकर्ता येते सामाजिक तेढ निर्माण करून जातीय दंगली घडडवण्याचे षडयंत्र करत आहे. आता आम्ही खैरलांजी होऊ देणार नाहीत. आता समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तर परिणाम वाईट होतील पँथर धर्तीवर उत्तर दिले जाईल.
किती दुर्दैव आहे, एका आर्यन खानला वाचवण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार मैदानात उतरली आहे. 100 बौद्ध मातंग गाव सोडून जातीयतेला कंटाळून जातात तेंव्हा तो साधी बातमी होत नाही? राज्य सरकारला मुद्दा वाटत नाही?
ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे की तात्काळ सर्व आरोपींना अटक करा, बौद्धांना मातंगांना शेतात जाण्यास वाट रस्ता द्या, गंजी जाळल्या आहेत त्यांना मोबदला द्या, गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी शांतता बैठक घ्या, पीडितांना संरक्षण द्या, काँग्रेसच्या माजी आमदाराला सहआरोपी करा, आरएसएसच्या संशयित कार्यकर्त्याची चौकशी करून त्यावर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करा! या समूहाला सामाजिक स्वतंत्र बहाल करा. 8 तासात जर आरोपी अटक झाले नाहीत तर अमरावतीमध्ये मोर्चा काढू, तात्काळ मुख्यमंत्र्यानी मंत्रिमंडळ बैठक बोलवून महाराष्ट्रातील दलित अत्याचारावर आळा घालण्यासाठी भूमिका घ्यावी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा आम्ही देत आहोत.
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...
*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...
वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...