शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मारोती डोंगे (कोरपना ): स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना ज्या ज्या वेळेस देशात आसमानी संकटे निर्माण झाले. तो मग महापूर असो, सीमेवर झालेले दहशतवादी भ्याड हल्ले असो, मागील वन वर्षी कोरोना विषाणूने घातलेल्या धुमाकूळ असो अशा प्रत्येक संकटा समयी ग्रुप सामाजिक भान ठेऊन मदतीला पुढे येत असतो. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीवनावश्यक वस्तूच्या 250 किटा गोरगरीब जनतेला वाटल्या होत्या, अशा असंख्य घडलेल्या संकटाचा वेळेस स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना मदतीला धावली आणि नेहमी धावत राहील. आज आपल्या देशात कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाची दुसरी लाट भयंकर सुनामी सारखी येऊन देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या मानेवर बसली आहे . या लाटेत इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे की, तो आपल्या विचारा पलीकडे आहे. आज ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा स्टुडंट फोरम ग्रुप मदतीला धाऊन आला आहे. ग्रुपच्या सौजन्याने डॉ. येरमे सरांनी कोरपना येथे ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन च्या नावाने सुरू केलेल्या मोफत कोविड उपचार केंद्राला चार जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व तिन लहान ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तयार असलेल्या ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन कोरपना तर्फे रुग्णसेवक श्री. दिनेश राठोड, संजय सोयाम, रवी मडावी यांच्या मदतीने कोविड सेंटर डॉ. प्रवीण येरमे सर यांनी सुरू केले आहे. तिथे कोरोना रुग्णावर निःशुल्क उपचार केला जात आहे. रुग्णांनी बर झाल्यानंतर जातीभेद सोडून समाज सेवा करावी हिच माझी तपासणी फी , असे म्हणून डॉ. येरमे साहेबांनी समाजाची सेवा करत आहे. असे उपक्रम यशस्वी होण्यात समाजाची बांधिलकी जपणाऱ्या अदृश्य हातांचा तितकाच वाटा आहे. त्याचेही ऋण मदतीच्या ओघातून दिसून येते.
हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी श्री.सुशील कुमार नायक सर(SDPO Nandafata), श्री.अनिल रेगुंडवार, श्री.आबिद अली, श्री.अरुण डोहे, श्री. किशोर बावणे, श्री.राजुभाऊ बुऱ्हान, अॅड. श्रीनिवास मुसळे, श्री. दिवाकर धोटे, श्री.विजय पानघाटे, श्री. नदीम सय्यद, श्री.तुषार देरकर, श्री.दिनेश ढेंगळे, श्री.अंशुल पोतनुलवार या सर्वांनी आम्हाला सहकार्य व प्रेरणा दिल्याने हे शक्य होऊ शकले. स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे या पुढे ही कोरोना लढ्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार अशी भावना ग्रुपच्या संघटकानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...