Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबन येथील कोळसा...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबन येथील कोळसा खदाणीतून ओव्हरलोड वाहतूक सुरू..!

मुकुटबन येथील कोळसा खदाणीतून ओव्हरलोड वाहतूक सुरू..!
ads images

ओव्हरलोडमुळे वणी ते मुकुटबन नवीन झालेल्या मार्गावर अनेक खड्डे, भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे जनतेच्या जीवाला धोका. 

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) :- तालुक्यातील मुकुटबन,अडेगाव,गणेशपूर व मार्किं - पांढरकवडा (ल) परिसरात डोलोमाईट कोळसा खदाण व चुना फॅक्टरी  सिमेंट फॅक्टरी असून सर्व खान खदान  मधून कोळसा,चुना व गोटा व इतर वाहतुकी करिता दररोज शेकडो ट्रकची दिवस रात्र  रेलचेल सुरू आहे. वरील कंपनीतून ट्रक दिवसरात्र जास्त क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोळसा लोड करून वाहतूक सुरू असल्याने प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून अंतर्गत रोडची चाळणी झाली आहे. मुकुटबन येथील  कोळसा खान सुरू झाल्यापासून कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.कोळसा वाहतूक करणारे ट्रक दिवसरात्र सुसाट वेगाने धावतात.

कोळसा वाहतूक करणारे ट्रक ड्रायवर रात्रीला नशा पाणी करून  नशेतच सुसाट वेगाने ट्रक चालवितात असे यापूर्वी रुईकोट व भेंडाळा येथील गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन ला केली होती तरीपण आजही ही कोळसा वाहतूक करणारी ट्रक सुसाट वेगानेंच धावताना दिसत आहे ज्यामुळे माणसाच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. गेल्या 1 महिन्यापासून मुकुटबन येथील कोळसा खदान सुरू झाल्यापासून दररोज दिवसरात्र कोळश्याची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मुकुटबन ते वणी नवीन झालेल्या मार्गावरील हिवरधरा गावापासून कायर पर्यंत अनेक खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. तर ट्रकमधील कोळशावर फारडीने झाकून नेट नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे मधोमध कोळसा पडलेला  आहे . त्यामुळे दुचाकी स्वारांचा अपघात होत आहे. मुकुटबन ग्रामवासीयांनी यापूर्वी कोळश्याची ओव्हरलोड वाहतूक रात्री 8 वाजेनंतर करण्याची तंबी दिली होती व वाहतूकही रात्रीच सुरू होती. परंतु नव्याने सुरू झालेली कोळसा खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू आहे. कोळसा खाणीतील काही मुजोर अधिकारी स्वतःला सर्व काही समजून व पोलीस खात्यातील लोकांना पकडून ओव्हरलोड कोळश्याची वाहतूक सुरू ठेवत आहे.

दिवसभर मुकुटबन शहराची बाजार पेठ सुरू असल्याने लोकांची रेचेल मोठ्या प्रमाणात राहते. तसेच काही वर्षांपूर्वी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या अपघातात एका व्यापाराचा मृत्यूसुद्धा झाला होता. त्यावेळी संपूर्ण गाव पेटून उठला होता व ट्रक जाळून आपला संताप व्यक्त केला होता. व 15 दिवस तणावाचे वातावरण होते.  तेव्हापासूनच जडवाहतुक रात्री 8 वाजतापासून करण्याचा निर्णय झाला होता. परंतु सदर कोळसा कंपनी कुणालाही न जुमानता दिवसरात्र ओव्हरलोड वाहतूक करीत आहे. कोळसा कंपनीला दिवसरात्र कोळसा वाहतूक करण्याची परवानगी कुणी दिली असा संतप्त प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

खदाणीतून  ओव्हरलोड वाहतूक पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलिसांना का दिसत नाही? तसेच आरटीओ विभागाने टन एक ट्रक मध्ये वाहतूक करण्याचे पास केले आहे याची सुद्धा पाहणी केली जात नसून फक्त अर्थपूर्ण संबंधामुळे ही वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे कोणतीही घटना किंवा दुर्घटना घडल्यास याला जबाबदार पोलीस , आरटीओ विभाग व कोळसा खदान मालक  असा संतप्त प्रश्न ग्रामवासी करीत असून ओव्हरलोड कोळसा भरून जाणाऱ्या ट्रकवर पोलीस व आरटीओ विभागाने त्वरित कार्यवाही करावी व दिवसा होणारी कोळसा वाहतूक सुद्धा बंद करावी अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...