Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / कापूस उत्पादक शेतक-यांनों,...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

कापूस उत्पादक शेतक-यांनों, रस्ता वरच्या लढाईसाठी सज्ज राहा - मधुसूदनजी हरणे (प्रदेशाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र) 

कापूस उत्पादक शेतक-यांनों, रस्ता वरच्या लढाईसाठी सज्ज राहा - मधुसूदनजी हरणे (प्रदेशाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र) 

कापूस उत्पादक शेतक-यांनों, रस्ता वरच्या लढाईसाठी सज्ज राहा - मधुसूदनजी हरणे (प्रदेशाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र) 

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): जगभरात कापसाचे उत्पादन कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात रूईच्या किंमतीत तेजी आली आहे. तसेच देशातील कापूस उत्पादनात अंदाजे 40 % नी कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे, म्हणून कापसाचे भाव किमान आधारभुत किंमतीपेक्षा 2000 ते 2400 रुपयांनी जास्त आहे. हा भाव कापसाचा उत्पादन खर्च भरून काढेल, असा असल्याने शेतकरी समाधानी आहे.

पण शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मिळत असलेला कापसाचा भाव हा कापड उद्योगातील व सरकार मधील काही धुरीणांनाचे नजरेत खूपत आहे. म्हणूनच दक्षिणेतील कापड लाँबीचे असोशिएशनने (दक्षिण भारत मिल्स असोसिएशन) देशातील कापूस उत्पादन हे देशातील कापड उद्योगला आवश्यक आहे,  तेवढेच असल्याने सरकारने "कापसाची निर्यात बंदी करावी" किंवा " कापसावरील आयात शुल्क " कमी करावे, अशी मागणी केली आहे. आणी याबाबतची बैठक सुध्दा झाली आहे.

दुसरीकडे  केंद्र सरकारने " सीसीआय " ला सन 2015 ते 2020 पर्यंतचा तोटा भरून काढण्यासाठी 17,408.85 कोटी रुपये दिले आहे. या कालावधीत बाजारात येणार्‍या एकूण कापसापैकी सीसीआयने फक्त 33 % कापूस खरेदी केला आहे, उर्वरित 67% कापूस बाजारातील व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. व्यापाऱ्यांना या कालावधीत तोटा होवून कोण्या व्यापाऱ्याचे " दिवाळे " निघाले, असे घडल्याचे उदाहरण नाही.

मग सीसीआय लाच तोटा का आला? म्हणून भीती आहे, सरकार या निधीचा वापर सीसीआयकडून कापसाचे भाव पाडण्यासाठी करू शकतो. कारण सीसीआयने आजपर्यंत बाजारात कुठेही खरेदी सुरू केली नाही, पण आता कापूस खरेदी करायची, आणी कमी भावात रूई, सरकीची विक्री करून बाजारातील रूई, सरकीचे भाव पाडायचे, कारण सोयापेंड आयात करून व खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करून सरकारने सोयाबीनचे भाव पाडले, त्यामुळे सरकारला टिकेला आणी रोषाला समोर जावे लागले. त्यामुळे सरकार हा कुटील डाव खेळण्याची दाट शक्यता आहे.

बाजारातील तज्ञांनी कापसाचा भाव 10,000 रूपये किवंटल पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना, सातत्याने सुरू असलेली भाववाढ थांबली, कारण बाजारातील व्यापाऱ्यांनी सरकार स्तरावरील घडामोडीचा वेध घेत खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे, परिणामी बाजारातील दर काही प्रमाणात कमी झाले आहे.

यासर्व घडामोडीत सरकार निर्यातबंदी सारखा किंवा आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे, पण हा निर्णय राजकीय तोट्याचा ठरेल म्हणून सीसीआय चा वापर करून बाजारातील भाव पाडण्याचा पर्याय केंद्र सरकार निवडू शकतो. यामुळे सरकारची बदनामी होणार नाही, सर्व पक्ष, नेते आणी शेतकरीसुध्दा दोष देतील ते व्यापाऱ्यांना. बदनामी होईल ती व्यापाऱ्यांची. मुळात सरकारचा कापूस बाजारातील हस्तक्षेप आणि बंधनांमुळे व्यापाऱ्यांना नाईलाजाने शेतकऱ्यांकडील कापूस कमी भावाने खरेदी करावा लागेल. हा खेळ सरकार करेल. अशी दुसरी शक्यता आहे.

या कोणत्याही निर्णयाचा " बळी " हा "कापूस उत्पादक शेतकरीच" ठरणार आहे, तेव्हा सरकारच्या कोणत्याही निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी " रस्त्यावरील लढाई " साठी सज्ज राहावे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...