Home / चंद्रपूर - जिल्हा / भारतीय स्वातंत्र्याचा...

चंद्रपूर - जिल्हा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाचे आयोजन..!

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाचे आयोजन..!

आदिवासी बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन..!

चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर या कार्यालयाच्यावतीने 9 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण दिनापासून वर्षातील पुढील 52 आठवडे दर सोमवारला जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील यशसिद्ध मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रातील यश संपादनाबाबतचा जीवन प्रवास, आश्रमशाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे उलगडावा, त्यातून विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती पासून ध्येयप्राप्ती पर्यंतची प्रेरणा मिळावी. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यातून पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे महत्त्व समजण्यास तसेच विविध व्यवसायाची ओळख होण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण तसेच व्यवसायाबाबतची जागरूकता वाढीस लागून चालना मिळेल. सदर उपक्रम एटीसी नागपुर, नवचेतना या यूट्यूब चैनलवर उपलब्ध असणार आहे.

या उपक्रमामध्ये नागपूर,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या सहाय्यक संचालक परिनीता पंधराम, नागपूर जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मनोहर मेश्राम, एल. पी.कोडापे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर उपक्रमाचे मार्गदर्शन यूट्यूब च्या माध्यमातून दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता https://youtu.be/y5uFGEeateY या लिंकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच दर सोमवारी प्रक्षेपित होणार्‍या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळविण्याकरिता https://www.youtube.com/channel/UCAD2ThI78aZ-rB58-JcjscA या लिंकद्वारे एटीसी नागपुर- नवचेतना या चॅनलला सबस्क्राईब करावे. तरी सदर मार्गदर्शनाचा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी व आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे व चिमूर येथील प्रकल्प अधिकारी के. ई.बावनकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...