वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या वतीने दिनांक 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे यांनी केले आहे.
ही असणार ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती:
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधुन महास्वयम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंट वर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-3 या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आय अॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.
सर्व उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करून दि. 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदाकरिता उद्योगांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग इत्यादींच्या माध्यमातून मेळाव्याचे दिवशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे कळविण्यात आले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...