Home / चंद्रपूर - जिल्हा / 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान...

चंद्रपूर - जिल्हा

1 ते 7 सप्टेंबरदरम्यान ‘मातृ वंदना’ सप्ताहाचे आयोजन

1 ते 7 सप्टेंबरदरम्यान ‘मातृ वंदना’ सप्ताहाचे आयोजन

आतापर्यंत जिल्ह्यात 51 हजारांच्या वर प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ

चंद्रपूर, दि. 31 ऑगस्ट : दि. 1 सप्टेंबर  ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत “मातृ वंदना सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. स्तनदा माता व गर्भवती महिलांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी व यशस्वीरित्या अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 53 हजार 284 इतक्या लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 51 हजार 408 लाभार्थ्यांना एकूण 23 कोटी 71 लक्ष 2 हजार  रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

भारतातील दारिद्रय  रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक व गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानांही मजुरीसाठी तात्काळ कामे करावी लागतात. त्यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही नवीन योजना संपूर्ण देशात दि. 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित केली आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून शंभर दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये, किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या जाईल. प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकाला पेन्टा तिसरे लसीकरण दिल्यानंतर तिसरा हप्ता रुपये 2 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात  जमा केला जाईल.

ही योजना सर्व स्तरातील महिलांना लागू आहे, परंतु वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना ही योजना लागू राहणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, बँक खाते पासबुक, माता बाल संरक्षण कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील स्तनदा माता व गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे. 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...