Home / चंद्रपूर - जिल्हा / 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत...

चंद्रपूर - जिल्हा

1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन

1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 सप्टेंबर : दरवर्षी 1 ऑक्टोंबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त नियमित रक्तदात्यांचे मुबलक प्रमाणात सुरक्षित रक्त व रक्तघटके रुग्णास मिळण्याकरीता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते. रुग्णसेवेत सुरक्षित रक्ताचा अखंडीत रक्तपुरवठा होत असल्यामुळे रुग्णास जीवनदान ठरते. रक्त हे कृत्रिम प्रकारे तयार करता येत नाही. ते फक्त स्वेच्छिक रक्तदात्याच्या माध्यमातून त्याचा पुरवठा होऊ शकतो. रक्तदात्यांचे रक्त हे सुरक्षित व आरोग्याने सुदृढ असलेल्या रक्तदात्यांचे रक्त हे बहुमूल्य असते.

कोविडजन्य परिस्थितीमुळे रक्ताची मागणी कमी असली तरी रक्तक्षयाच्या अनेक व्याधीमध्ये जसे की, थॅलॅसिमिया, सिकलसेल इत्यादी आजार तथा गरोदरपणात व अपघातजन्य परिस्थितीमध्ये रक्ताची मागणी ही सतत वाढत असते.

त्यामुळे रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याकरिता राष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय रक्तसंक्रमण तर राज्यस्तरावरून राज्य रक्त संक्रमण परिषद 1 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत महिन्याभरात स्वैच्छिक रक्तदान चळवळीद्वारे विविध रक्तदान शिबिराचे तथा रक्तपेढीमध्ये स्वेच्छिक रक्तदात्यांचे रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ज्या स्वेच्छिक रक्तदात्यांनी कोविडचे लसीकरण केले आहे, असे रक्तदाते लसीकरणाच्या 14 दिवसानंतर नियमितपणे रक्तदान करू शकतात.

हा आहे राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदानाचा उद्देश

सुरक्षित रक्ताचा पुरवठा अविरतपणे रक्तपेढीत उपलब्ध असल्यास रुग्णांना जीवनदायी ठरू शकते. यासाठी ज्या स्वेच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ज्या रक्तदात्यांने पहिल्यांदा रक्तदान केले आहे, अशा रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करणे. जागतिक, राष्ट्रीय, राज्यस्तरीय तथा स्थानिकरीत्या कार्यरत असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांना स्वेच्छा रक्तदानाकरिता प्रोत्साहित करून रक्ताच्या स्त्रोतात मुबलकता निर्माण करणे. स्वेच्छिक रक्तदान शिबिर चळवळीसाठी व्याख्यान कार्यशाळेचे आयोजन करणे. महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू, पोलीस तथा अन्य विभागात कार्यरत असलेल्यांना स्वेच्छिक रक्तदान चळवळीचे महत्व रुजावे या दृष्टिकोनातून व्यापक प्रमाणात प्रसिद्धी साहित्याच्या माध्यमातून प्रोत्साहित करणे. शैक्षणिक संस्थेमध्ये रक्तदान चळवळीचे महत्त्व पटवून देणे. रक्तदान चळवळीचे घोषवाक्य सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात पेंटिंग करून समाजात जनजागृती करणे.

तसेच स्थानिक सेवाभावी संस्था व शासकीय संस्थेच्या मदतीने व्याख्यानमाला व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणे. त्यासोबतच विनामोबदला स्वेच्छिक रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करून अशा रक्तदात्यांची स्त्रोत 100 टक्के निर्माण करणे व रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्तपेढी पर्यायी रक्तदाते मागणीचे प्रमाण निरंक करणे हे या चळवळीमागचा मुख्य उद्देश आहे.

तरी या स्वेच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे व ही रक्तदान चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...