वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ द्वारा आयोजित स्मृतिपर्व 2021.महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस याचे औचित्य साधून, यवतमाळमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता परिसर आझाद मैदान, यवतमाळ येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति, डॉ. आंबेडकर लॉयर असोसिएशन, सत्यशोधक आदिवासी विकास परिषद,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रचारक समिती यवतमाळ
गुरु रविदास विचार मंच यवतमाळ , संताजी नागरी सहकारी पतसंस्था, यवतमाळ .
संत गाडगेबाबा सर्वभाषिक महासंघ ,जमात-ए-इस्लामी हिंद, यवतमाळ , भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, सत्यशोधक स्टडी सर्कल, यवतमाळ. स्मृति पर्व महिला समिती, साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विचार मंच ,यवतमाळ .आंबेडकरी साहित्य कला अकादमी, यवतमाळ च्या वतीने दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आज दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते सदर स्मृती पर्वाचे उद्घाटन होत असून ,माननीय संतोष भाऊ अरसोड कार्यकारी संपादक मीडिया वॉच हे संत गाडगेबाबा- एक विवेकाचा प्रवास, या विषयावर व्याख्यान करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यवतमाळ आणि अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर आशाताई देशमुख माजी प्राचार्य लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉयर असोसिएशन यवतमाळ च्या वतीने सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर 2021रोजी सायंकाळी सहा वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संघराज्य पद्धती व वर्तमान परिस्थिती .प्रमुख वक्ते एडवोकेट भूपेंद्र रायपुरे भद्रावती जिल्हा चंद्रपूर.अध्यक्षस्थानी राहणार आहेत एडवोकेट नरेंद्र मेश्राम .
दिनांक 30 नोव्हेंबर 2021रोजी सत्यशोधक आदिवासी विकास परिषद च्या वतीने विषय आहे संविधान: बदलते राष्ट्रीय धोरण आणि आदिवासी .प्रमुख वक्ते डॉ. बळीराम भुर्के, डेल्टा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , नांदेड
कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय यु.डी.आगरे, संचालक महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संस्था पुणे .
दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती, यवतमाळ अध्यक्षस्थानी साहेबरावजी खडसे सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ. प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर धम्मसंगिनी. रमागोरख नागपुर .सामाजिक आरक्षण चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत .विषय : समाजातील युवकांची शैक्षणिक स्थिती आणि रोजगारांची संधी .
त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता गुरु रविदास विचार मंच यवतमाळच्या वतीने भारतातील समतावादी परंपरा बुद्ध कबीर गुरु रविदास फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलतील प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत संविधान प्रचारक .अध्यक्ष आहेत मा. कमलताई खंडारे .अध्यक्ष भारतीय पिछडा(ओबीसी )संघटन यवतमाळ .दिनांक 2 डिसेंबर.2021.रोजी संताजी नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ
च्या वतीने फुले आंबेडकरांच्या वैचारिक दिशा .भारतीय संविधान ओबीसी ची दशा .या विषयावर मा. एडवोकेट धनराज वंजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई .अध्यक्षस्थानी मा. डॉ. दीपक शिरभाते .माजी अध्यक्ष संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ .
त्याच दिवशी रात्री आठ वाजता गाडगेबाबा सर्वभाषिक महासंघ यवतमाळ .विषय गाडगे महाराजांचे अखेर चे किर्तन .अध्यक्ष मा. श्रीकृष्ण तपके साहेब ,
प्रमुख वक्ता मा. कैलास महाराज खडसान, आकोट जिल्हा आकोला .
दिनांक 3 डिसेंबर 2021रोजी. जमात ए इस्लामी हिंद यवतमाळ
विषय आहे सामाजिक सद्भावना तथा राजकीय निहितार्थ .व्याख्याते आहेत मा. वाजीत कादरी अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद औरंगाबाद .आणि प्रस्तावना करणाऱ जियाउद्दिन अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद यवतमाळ .
दिनांक 4 डिसेंबर 2021रोजी भारतीय पिछडा (ओबीसी)संघटना नई दिल्ली यवतमाळ व
सत्यशोधक स्टडी सर्कल यवतमाळ
च्या वतीने १)महात्मा फुले - डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन २)फुले आंबेडकर यांची शैक्षणिक विचारधारा व नवीन शैक्षणिक धोरण 2020 मुळे होणारा आघात ,
वक्ते आहेत मा. रमेश बीजेकर .सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र नागपूर, प्राध्यापक सविताताई हजारे यवतमाळ .अध्यक्षस्थानी आहेत म्हणे डॉ. ज्ञानेश्वर गोरे (गोबरे )प्रदेशाध्यक्ष भारतीय पिछडा (ओबीसी)संघटन तथा उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा .व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ .
दिनांक 5 डिसेंबर 2021 स्मृति पर्व महिला समिती यवतमाळ. विषय आहे: राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक संविधानिक अधिकाराबाबत सरकारने केलेली दिशाभूल , प्रमुख वक्ते मा. कुलदीप रामटेके संचालक नागार्जुन इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर .अध्यक्ष आहेत मा. संध्याताई राजूरकर निवासी संपादक दैनिक बहुजन सौरभ नागपूर. दिनांक 6 डिसेंबर 2021 साहित्यरत्न व कला सांस्कृतिक विचार मंच यवतमाळ. सायंकाळी सहा वाजता व्याख्यान : समाजाचा इतिहास त्यांची शैक्षणिक स्थिती आणि वर्तमान शैक्षणिक धोरण .अध्यक्ष देविदास महाले सामाजिक कार्यकर्ते .प्रमुख वक्ते प्राध्यापक बबन इंगोले .अमरावती समारोपीय कार्यक्रमांमध्ये आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाळ. विषय खैरलांजी व्हाया उन्नाव ते हाथरस : सकल व्यवस्थेची भूमिका
प्रमुख वक्ते मा. प्राध्यापक डॉ. अनिल काळबांडे उमरखेड. अध्यक्ष मा. इंजिनियर संजय मानकर उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ.
या नऊ दिवस होणाऱ्या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत डॉ. ज्ञानेश्वर गोरे .विलास काळे. प्रवक्ता आहे आनंद गायकवाड .विशेष सहकार्य डॉ.टी सी.राठोड .सिद्धार्थ भवरे
राजूदास जाधव .दीपक नगराळे .प्राध्यापक सलीम चव्हाण प्रसिद्धी विभागाची जबाबदारी दिलेली आहे प्राध्यापक काशिनाथ लाहोरे .अंकुश वाकडे .विवेक वानखडे सोशल मीडिया प्रमुख आहेत डॉक्टर संजय ढाकुलकर .प्रफुल खेडकर .राहुल पाटील .या कार्यक्रमाकरिता सहकार्याची भूमिका रियाज सिद्दिकी .सुनिता काळे .मायाताई गोरे .सिंधुताई धवणे यांचेसहकार्य मिळालेले आहे... या स्मृती पर्वाला यवतमाळ येथील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...