खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मारेगाव: तालुक्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या सुप्रसिद्ध अशा बोरी (बु) गावात आज दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोज मंगळवार ला कार्तिक एकादशी निमित्ताने सद्गुरू संत श्री गदाजी महाराज पालखी मिरवणूक दहीहंडी व महाप्रसाद सोहळा संपन्न झाला. बोरी (बु) हे गाव पंचक्रोशीत 'बोरी गदाजी' आणि 'बोरी गोटमार' या नावाने ओळखले जाते. या गावी सुप्रसिद्ध असे श्री संत गदाजी महाराज यांचे मंदिर आहेत. दरवर्षी होळीनिमित्त या गावी भव्य दिव्य अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोटमारीचे आयोजन केल्या जाते,तसेच यात्रा सुद्धा भरविण्यात येते. एकंदरीत गावाला भरभरून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिक एकादशी निमित्ताने सद्गुरू संत श्री गदाजी महाराज पालखी मिरवणूक दहीहंडी व महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. श्री संत गदाजी महाराज यांच्या मंदिराची (गाभाऱ्याची फुलांच्या साहाय्याने सजावट करण्यात आली तसेच सुंदर रांगोळ्या आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळा या या सजावटीचे प्रमुख आकर्षण होत्या.
भजन करून या महोत्सवाची सुरवात करण्यात आली तसेच गावात पालखी सोहळ्याचे सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावभर श्री संत गदाजी महाराज यांची मूर्ती स्थापित असलेल्या पालखीची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. पालखीची छानप्रकरे सजावट सुद्धा करण्यात आली होती. संपूर्ण भक्तांची मांदियाळी यावेळी पालखी भोवताल दिसत होती.भजन मंडळी, गावकरी हे या पालखी मिरवणुकीच्या वेळी श्री संत गदाजी महाराज यांच्या भक्तीत तल्लीन झाले होते. मंदिराचे पुजारी श्री प्रवीण उराडे महाराज यांची उपस्थिती यावेळी आकर्षित करणारी होती. सायंकाळी गावात या महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...