श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
आशाच्या आंदोलनाला माकप व किसान सभेच्या पाठिंबा
वणी : मागील ७ दिवसांपासून राज्यातील आशा कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन संपावर आहेत. त्याच संपचे अनुषंगाने आपल्या मागण्या तीव्रतेने रेटण्यासाठी " सिटू "संघटनेच्या माध्यमातून वणी येथे दि. २२ जून रोजी एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करीत प्रचंड नारेबाजी करीत सरकारच्या धोरणाच्या निषेध करण्यात आला.
या आंदोलनात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या रेटण्यात आल्या. गतप्रवर्तकांना दरमहा २२ हजार ₹ व आशांना दरमहा १८ हजार ₹ किमान वेतन देण्यात यावे, प्रोत्साहन भत्ता प्र. दिवस ५०० ₹ देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तकाची कायम नियुक्ती करावी, गटप्रवर्तकांना किपिंगचे ३००० ₹ देण्यात यावे, आशांना आरोग्य वर्धिनीचे मानधन देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तकांना स्वतंत्र कार्यालय मिळावे आदी मागण्या यावेळेस करण्यात आल्या.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना ( सिटू ) चे वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आशा व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. शंकरराव दानव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे कॉ. ऍड. दिलीप परचाके हे आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रीती करमनकर, मेघा बांडे, प्रणाली कुचनकर, माधुरी पारेलवार, किरण बोनसुले यांनी केले. या आंदोलनात प्रामुख्याने नमा पथाडे, चंदा मडावी, अनिता जाधव, अनिता काळे, सुनीता कुंभारे,ईशा भालेराव, रिजवाना शेख, सोनाली निमसटकर, चंदा पथाडे, कल्पना मजगवली, आदींनी सहभाग घेतला होता.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...