Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / विदर्भ राज्य आंदोलन...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने २८ सप्टेंबर ला नागपूर करार जाळून क्रांती चौक राळेगाव येथे महाराष्ट्र सरकारचा केला निषेध तर स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी केली निदर्शने.

विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने २८ सप्टेंबर ला नागपूर करार जाळून क्रांती चौक राळेगाव येथे महाराष्ट्र सरकारचा केला निषेध तर स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी केली निदर्शने.

प्रविन गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): विदर्भाला महाराष्ट्र राज्यात सामील करण्यास भाग पाडलेल्या 'नागपूर कराराची' होळि करुन विदर्भाचा सतत अन्याय करणाऱ्या, विदर्भाचे नेहमी शोषण करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला तर स्वतंत्र विदर्भाच्या आवाज बुलंद करून केंद्र सरकारने त्वरित विदर्भ राज्याची निर्मिती करावी यासाठी निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकतें उपस्थित होते.

 २८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भचे व उर्वरीत महाराष्ट्राचे काही काँग्रेस काँग्रेसचे नेते एकत्र येऊन त्यांनी एक नागपूर करार केला. विदर्भाला या नागपूर करारातील ११ कलमानुसार महाराष्ट्र राज्याच्या नौकरीमध्ये उच्च पदाच्या नोकऱ्यामध्ये, विकासाच्या निधीमध्ये, मंत्रीमंडळामध्ये, महामंडळामध्ये २३ टक्के वाटा देऊ असे कबूल करून विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करून घेतले व तेव्हापासूनच विदर्भाचे शोषण सुरू केले. विदर्भ राज्यावर अन्याय सुरूच आहे.

विदर्भातील तरुणाला २३ टक्के नोकरी देण्याचे नागपूर करारामध्ये मान्य केले परंतु नोकऱ्या फक्त ७ टक्केच दिल्या, चार लाख नौकऱ्या पळविल्या म्हणून विदर्भात बेरोजगारांची फौज उभी आहे.७५ हजार कोटी सिंचनाचे,५० हजार कोटी रस्त्याचे पळविले म्हणून गोसीखुर्द सह १३१ धरणे अपूर्ण राहिले.

ज्या नागपूर कराराचे पालन केले नाही त्या नागपूर कराराची होळी आज राळेगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने करुन  वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ऊपाध्यक्ष राजेंद्रभाऊ झोटींग, राळेगाव विधानसभा प्रमुख होमदेवजी कन्नाके,करुनाताई वानखेडे, दिक्षाताई नगराळे, अक्षयजी महाजन, गोपालजी भोयर, गजाननजी पारखी, देवाजी बोबडे, भास्करजी पाटील, गजाननजी ठाकरे, विठ्ठलजी खोडें, गजाननजी कोल्हे, कैलासजी येरेकर, मनोजजी तामगाडगे, सुरेशजी आगलावे, इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...