Home / चंद्रपूर - जिल्हा / विदर्भ किसान मजदूर...

चंद्रपूर - जिल्हा

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस शहर व जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात “ ईरई नदी बचाओ आंदोलन " पार पडले

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस शहर व जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात “ ईरई नदी बचाओ आंदोलन

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस शहर व जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात “ ईरई नदी बचाओ आंदोलन " पार पडले

चंद्रपूर: ( १८ सप्टेंबर, २०२१ ) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या सुयोग्य मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक १८ सप्टेंबर, २०२१ रोजी काँग्रेसचे युवा नेते मा. श्री. राहूलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात ईरई नदीच्या पात्रात व पूलावर ईरई नदी बचाव आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनातील खालील प्रमुख मागण्या..

१) ईरई नदीवर बंधारा बांधण्यात यावा, जेणेकरून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढेल व चंद्रपूर शहराला अधिक व भरपर प्रमाणात पीण्याचे पाणी उपलब्ध करून देता येईल.

२) ईरई नदीचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे.

३) ईरई नदीवर उड्डाणपूल झाल्यानंतर नदी पात्रातील मातीचे ढिगारे व पूर्वीच्या जून्या पूलाचे अवशेष हटवून नदी स्वच्छ करण्यात यावी.

४) उड्डाण पूलाचे बांधकाम सुरू असतांना नदी पात्रात निर्माण झालेले मातीचे ढिगारे आज नदीला स्थायी स्वरूपात उथळ करून प्रवाह बाधित करीत आहेत. त्या ढिगा-यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगले वाढून नदीचा प्रवाह बाधित झाला आहे व नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदी पात्रातील सर्व ढिगारे हटवून नदीचे खोलीकरण करण्यात यावे.

५) नदीच्या तीरावरील परीसरात श्री गणेश विसर्जन, गौरी पूजन, छट पूजा व इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी ओटे ( प्लॅटफार्म ) तयार करून त्याला लागून घाट व पाय-या बांधण्यात याव्यात. याच परीसरात चौपाटी सारखे विकास करून सौंदर्यीकरण करण्यात यावे.

वरील सर्व विकास कामे जिल्हयाच्या खनिज विकास निधीतून तयार करण्यात यावी. वरील सर्व विकास कामे जिल्हयाच्या खनिज विकास निधीतून तयार करण्यात यावी, असे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांना पाठविण्यात आले.
" ईरई नदी बचाव ", " ईरई नदीचे खोलीकरण", "ईरई नदीवर बंधारा झालाच पाहीजे"

 इत्यादी ना यांनी ईरई नदीचा परीसर निनादून गेला.

याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर ग्रामिण अध्यक्ष सर्वश्री गजाननराव गावंडे, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करणबाबू पुगलिया, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक  देवेंद्र बेले, महासचिव तथा नगरसेवक अशोक नागापूरे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, NSUI चे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील तिवारी, दुर्गेश चौबे,कामगार नेते वसंत मांढरे, विरेंद्र आर्य,  रामदास वाग्दरकर, अजय मानवटकर, काँग्रेसचे रतन शिलावार, अजय महाडोळे, प्रतिक तिवारी, बाबूलाल करुणाकर, क्रिष्णा यादव, पृथ्वी जंगम व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

(आंदोलन कर्त्याच्या वतीने सोबतच्या निवेदनातील आग्रही मागण्या करण्यात आल्या.)

आपले विनीत
( व्हि. कुमार )
ऑफिस सेक्रेटरी

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...