आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना( प्रतिनिधी) : कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अकोट येथील राष्ट्रीय कृतिशील प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांना व सेवार्थ सन्मान वनहक्क चळवळीतील युवा अग्रणी, सामाजिक कार्यकर्ते विजय देठे यांना जाहीर करण्यात आला.
बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर मागील ३५ वर्षे निशुल्क उपचार करत असून पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना त्यांनी बरे केले आहेत. ग्रामसभेने त्यांना 'डाॅक्टर' ही ऐतिहासिक उपाधी दिली. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ सदर पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी सत्यपाल महाराज यांची किर्तनात्मक प्रकट मुलाखत यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते, संपादक संतोष अरसोड व अधिवक्ता दीपक चटप घेतील.
अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सत्यपाल महाराज यांनी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरीत होवून हातात झाडू व खंजेरी घेवून प्रबोधनाच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. किर्तनाच्या माध्यमातून राज्यातील गावागावात सामाजिक विषमतेविरुद्ध जागरुकता पसरवली. ते प्रख्यात कृतिशील व विज्ञानवादी सुधारक आहेत. जिल्ह्यातील आश्वासक सामाजिक कार्यकर्ते विरूर स्टे.येथील पर्यावरण मित्रचे विजय देठे यांनी गोंडपिंपरीतील पाचगाव गावाला सामुहिक वनहक्क मिळवून देत आदर्श व्यवस्थापनाचे देशात माॅडेल उभे केले. वनहक्कासोबतच रोजगार हमी योजनेतून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यात पहिल्यांदाच बेरोजगार भत्ता त्यांनी मिळवून दिला आहे.
२०१२ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता, फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते. यंदाचा दिव्यग्राम महोत्सव २ नोव्हेंबरला आयोजित असून माजी आमदार ॲड.वामनराव चटप, डॉ.गिरीधर काळे, सविता काळे, स्वागताध्यक्ष संतोष उपरे यांच्या कार्यक्रमात हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे अविनाश पोईनकर, रत्नाकर चटप, गणपत तुम्हाणे, हबीब शेख, इराना तुम्हाणे, संदीप पिंगे, राहूल आसूटकर, सतिश पाचभाई, विठ्ठल अहिरकर, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, कार्तिक मोरे, स्वप्निल झुरमुरे, राजेंद्र सलाम, राजेश खनके, सचिन मडावी, सुरज लेडांगे, विशाल अहिरकर, आकाश चटपल्लीवार, आकाश उरकुडे, महेश नाकाडे, गणपत मडकाम, चंपत तुम्हाणे, संतोष बावणे, समीर शेख, अनिल हिंगाणे, वैभव आमने, मारोती मट्टे, सुरज मडावी, संदिप कोटनाके, महेश राठोड यांनी कळवले आहे.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...